आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : जेव्हा दादी अवतरली या रुपात हसूनहसून लोटपोट झाली बिपाशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री बिपाशा बसू अलीकडेच 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोमध्ये कपिल शर्माची पाहुणी म्हणून सहभागी झाली होती. खरं तर सेलिब्रिटी या शोमध्ये आपल्या सिनेमांच्या प्रमोशनच्या निमित्ताने हजेरी लावत असतात. बिपाशा मात्र आपली नवीन फिटनेस डीव्हीडी लाँच करण्यासाठी या शोमध्ये सहभागी झाली होती.
यापूर्वी बिपाशाने दोन फिटनेस डीव्हीडी लाँच केल्या आहेत. अलीकडेच बिपाशाच्या या स्पेशल एपिसोडचे शुटिंग मुंबईतील फिल्म सिटीत करण्यात आले. हा एपिसोड लवकरच कलर्स वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे.
बिपाशा स्पेशल या एपिसोडमध्ये भरपूर धमालमस्ती झाली. एकीकडे कपिलने आपल्या एव्हरग्रीन पंचेसनी लोकांना भरपूर हसवले. तर दुसरीकडे दादीनेही आपल्या हटके अंदाजाने बिपाशाचे मनोरंजन केले. 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'च्या या एपिसोडची थीम फिटनेस ठेवण्यात आली होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन छायाचित्रांमध्ये बघा 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'च्या बिपाशा स्पेशल एपिसोडची एक छोटीशी झलक...