आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जॉनला बिपाशा विसरली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - बॉलिवूडमध्ये कोणचे कधी बिनसेल याचा नेम नाही. आठ वर्ष सोबत राहिल्यानंतर बिल्लो राणी म्हणजेच बिपाशा बसूने तिचा पूर्वीचा प्रियकर जॉन अब्राहम याला ओळखत नसल्याचे नुकतेच एका कार्यक्रमात सांगितले. बिपाशा आणि जॉन ही बॉलिवूडमधील हॉट जोडी म्हणून ओळखली जायची. त्यांच्या प्रेमलीलांचे किस्सेही ऐकायला, पहायला मिळायचे. दोघांनी जन्मभर साथ निभावण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. मात्र, त्यांचे एका कारणावरून फाटले. त्यानंतर दोघांतूनही विस्तव जात नाही. एका मुलाखतीत बिपाशाला जॉनबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने हा प्रश्नच उडवून लावला. कोण जॉन... तुम्ही कोणाबद्दल मला विचारताय... मी जॉन नावाच्या कोणत्याही व्यक्तीला ओळखत नाही, असे ती वैतागून म्हणाली.