आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोहर खानने बॉयफ्रेंड आणि मित्रांसह साजरा केला बर्थडे, पाहा PARTYमधील PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गोहर खान बॉयफ्रेंड कुशाल आणि बहीण निगार खानसह)
मुंबई: 'बिग बॉस' या वादग्रस्त शोच्या सातव्या पर्वाची विजेती ठरलेल्या गोहर खानने काल (23 ऑगस्ट) वाढदिवस साजरा केला. या निमित्त तिने एका पार्टीचे आयोजन केले होते. त्यामध्ये तिचा बॉयफ्रेंड कुशाल टंडन, बहीण निगार खान, टीव्ही अभिनेता करणवीर बोहरा, सुशांत सिंह राजपूत आणि रणवीर शौरीसह अनेक सेलेब्सनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती.
गोहरने केक कापून सेलिब्रेशनला सुरुवात केली. पार्टीत तिच्या मित्र-मैत्रीणींनी धमाल-मस्ती केली. यावेळी गोहरला अनेक गिफ्ट्सदेखील मिळाले. परंतु ज्या बुकेवर गोहरच्या नावाचे G लिहिलेले होते त्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. गोहरने या बुकेचे छायाचित्र टि्वटरवर पोस्ट करून लिहिले, 'shaaaaaaank u.... It's beautiful. या टि्वटमध्ये तिने कुशालच्या नावाचा उल्लेख केला होते. कारण हा बुके तिचा बॉयफ्रेंड कुशाल टंडनने तिला दिला होता.
गोहरच्या बर्थडे पार्टीची काही छायाचित्रे टि्वटरवर शेअर करण्यात आली होती. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीतील सेलेब्सची छायाचित्रे...