आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Special: 'Bigg Boss' Contestant Karishma Tanna

B'Day: 31 वर्षांची झाली 'बिग बॉस'ची स्पर्धक करिश्मा, पाहा निवडक PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- करिश्मा तन्ना)
टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या रिअॅलिटी शो 'बिग बॉस 8'मध्ये दिसत आहे. तिने एकता कपूरच्या 'क्योकी सास भी कभी बहू थी' मालिकेत काम केले होते. या मालिकेत तिने इंदू वीरानीची भूमिका साकारली होती. मागील वर्षी 'ग्रँड मस्ती' सिनेमात महत्वाची भूमिका साकारली होती. जाणून घेऊया तिच्या आयुष्याविषयी...
फॅशन ब्रँड 'लव्ह'ची ब्रँड अॅम्बेसडर-
21 डिसेंबर 1983 रोजी मुंबईमध्ये तिचा जन्मलेली करिश्मा सध्या फॅशन ब्रँड 'लव्ह'ची ब्रँड अॅम्बेसडर आहे. तिने वॉशिंग पाऊडर निरमा आणि स्टफ्रीसारख्या अनेक ब्रँडच्या जाहिरातील केल्या आहेत.
टीव्ही इंडस्ट्रीत पहिले पाऊल-
करिश्माने एकता कपूरची मालिका 'क्योकी सास भी कभी बहू थी'मधून टीव्ही इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. ही मालिका 2000पासून 2008मध्ये प्रसारित झाली होती. 'क्योकी...'मध्ये तिच्या पात्राचे नाव इंदू वीरानी होते, ती एक नटकट तरुणी होती य तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी खास पसंत केले होते. 'क्योकी...' व्यतिरिक्त 'कोई दिल मे है', 'तार होने को है', 'बाल वीर' आणि 'एक लडकी अनजानी सी'सारख्या मालिकांत तिने काम केले आहे.
बॉलिवूड पदार्पण-
टीव्हीसह करिश्मा बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावत आहे. तिने 2005मध्ये 'दोस्ती: फ्रेंड्स फॉरएव्हर' सिनेमातून पदार्पण केले. तिने 'आय अॅम सॉरी माथे बनी प्रीतसोना' (2011, कन्नड) आणि 'ग्रँड मस्ती' (2013)मध्येसुध्दा काम केले. करिश्माच्या आगामी 'टीना और लोलो' सिनेमाचे शूटिंग सध्या चालू आहे. पुढील वर्षी हा सिनेमा रिलीज होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा करिश्मा तन्नाची (सिंगल आणि फ्रेंड्स/ कलीग्ससोबत) काही छायाचित्रे...