आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

31 वर्षांची झाली ही 'दुल्हन', अभिनेत्री नव्हे आर्मी ऑफिसर बनवण्याचे होते स्वप्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः टीव्हीवर दुल्हन आणि इशिता या नावांनी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हिने वयाची 31 वर्षे पूर्ण केली आहेत. 14 डिसेंबर 1984 रोजी भोपाळ येथे तिचा जन्म झाला. टीव्ही मालिकांमध्ये काम करण्याचे स्वप्न कधीही तिने पाहिले नव्हते. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या दिव्यांकाचे आर्मी ऑफिसर बनण्याचे स्वप्न होते. तिचे आईवडील एनसीसी कॅडेट होते. त्यामुळे दिव्यांकाही काही वर्षे एनसीसी कॅडेट राहिली. तिथेच तिने बंदुक चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. शूटिंग रेंजमध्ये निशाणा साधण्याचा सराव ती करायची. अनेक गोल्ड आणि सिल्व्हर मेडल्स तिने जिंकले आहेत. याशिवाय तिला हॉर्स रायडिंग आणि वॉटर स्किइंगचीही आवड आहे.
आईने दिला पाठिंबा
एका मुलाखतीत दिव्यांकाने सांगितले होते, ''एकदा भोपाळमध्ये सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आईने मला म्हटले, तुझ्याकडे इवनिंग गाउन आहे, त्यामुळे तू या स्पर्धेत भाग घे. दिव्यांकाला मुलांसारखे कपडे परिधान करायची सवय होती. त्यामुळे पहिल्यांदा आईला नाही म्हटले. मात्र आईने समजूत घातल्यानंतर मी पहिल्यांदा एखाद्या सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला.''
वडिलांचे आहे मेडिकल स्टोअर
दिव्यांकाच्या वडिलांचे भोपाळमध्ये मेडिकल स्टोअर आहे. तिच्या कुटुंबात आईवडील, एक बहीण आणि एक भाऊ आहे. तिचे आईवडीलसुद्धा एनसीसी कॅडेट होते. येथेच तिच्या आईवडिलांची भेट झाली, प्रेम जडले आणि दोघांनी लग्न केले. आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत दिव्यांकासुद्धा एनसीसीमध्ये सहभागी झाली. येथे ती बेस्ट कॅडेट ठरली होती.
रायफल शूटिंगमध्ये ठरली बेस्ट
आर्मी ऑफिसरचे स्वप्न बघणा-या दिव्यांकाला ड्राइंग, स्कॅचिंग, सिंगिंग आणि डान्सची विशेष आवड आहे. दुरदर्शनवरील काही कार्यक्रमांमध्ये तिने भाग घेतला होता. ती अभ्यासातही हुशार आहे. शालेय शिक्षण घेत असताना तिने रायफल शूटिंगचे ट्रेनिंग घेतले होते. तिची आजही रायफल शूटिंगमधील रुची कायम आहे. भोपाळमध्ये आल्यानंतर ती आवर्जुन शूटिंग रेंजवर जात असते.
'इंडियाज बेस्ट सिनेस्टार'पासून सुरु झाले करिअर
2004 मध्ये झी टीव्ही वाहिनीवरील 'इंडियाज बेस्ट सिनेस्टार' या कार्यक्रमाद्वारे दिव्यांकाने आपल्या करिअरची सुरुवात केली. या टॅलेंट शोमध्ये भाग घेण्यासाठी ती भोपाळहून दिल्लीत आली होती. येथे सूपर मॉडेल्सना बघून तिचा आत्मविश्वास डगमळला होता. मात्र तरीदेखील ती या टॅलेंट शोमध्ये सहभागी झाली. येथे तिला मिस ब्युटीफूल स्किनचा अवॉर्ड मिळाला. त्यानंतर तिने मिस भोपाळचा किताब आपल्या नावी केला. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर तिला मुंबईतील कॉल येणे सुरु झाले. एकेदिवशी शकुंतलम फिल्म्सकडून तिला ऑडिशनसाठी फोन आला. ऑडिशनच्या आठवड्याभरानंतर तिची निवड झाल्याचे तिला कळवण्यात आले. 'बनूं मैं तेरी दुल्हन' या मालिकेत तिला लीड रोल मिळाला. सध्या दिव्यांका स्टार प्लसवरील 'ये हैं मोहब्बतें' या मालिकेत लीड रोल साकारत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, दिव्यांकाची निवडक छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...