आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'day: 30 वर्षांची झाली 'सरस्वतीचंद्र'ची कुमुद, पाहा निवडक PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : जेनिफर विंगेट पुर्वाश्रमीचा पती करण सिंह ग्रोवरसोबत)
मुंबईः टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेटने वयाची 30 वर्षे पूर्ण केली आहेत. 30 मे 1985 रोजी मुंबईतील गोरेगाव येथे तिचा जन्म झाला. जेनिफरला 'कसौटी जिंदगी की'मधील सपोर्टिंग रोल, 'दिल मिल गए' (मल्टीस्टारर) आणि 'सरस्वतीचंद्र'मधील मेन लीडसाठी ओळखले जाते. 2013 आणि 2014 मध्ये सरस्वतीचंद्र मालिकेतील भूमिकेसाठी तिला इंडियन टेलिव्हिजन अकॅडमीचा बेस्ट अॅक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला आहे. या मालिकेत तिने 'कुमुद सुंदरी' हे पात्र साकारले होते. सध्या जेनिफर 'फिर से' या आपल्या पहिल्या बॉलिवूड सिनेमाच्या रिलीजची वाट बघत आहे. यावर्षी जूनमध्ये हा सिनेमा रिलीज होण्याची शक्यता वर्तवली जातेय. अभिनेता आणि दिग्दर्शक कुणाल कोहलीचा हा सिनेमा असून खरं तर मे महिन्यात रिलीज होणार होता. मात्र लेखिका ज्योती कपूर आणि कुणाल कोहली यांच्यातील कायदेशीर वादामुळे रिलीज अटकले आहे.
अनेक मालिकांमध्ये केले आहे काम...
जेनिफरला 'दिल मिल गए' आणि 'सरस्वतीचंद्र' या मालिकांमुळे लोकप्रियता मिळाली. मात्र यापूर्वी ती 'शाका लाका बूम बूम', 'कुसुम', 'कोई दिल में है', 'कसौटी जिंदगी की', 'क्या होगा निम्मो का', 'संगम', 'कहीं तो होगा' आणि 'कृतिका' या मालिकांमध्येही झळकली आहे.
लग्नाच्या अडीच वर्षांतच पतीपासून झाली विभक्त
जेनिफरने एप्रिल 2012 मध्ये 'दिल मिल गए' या मालिकेतील तिचा को-स्टार करण सिंह ग्रोवरसोबत लग्न केले होते. मात्र अडीच वर्षांतच त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि नोव्हेंबर 2014 मध्ये दोघे विभक्त झाले. याचे कारण 'अलोन' या सिनेमाच्या वेळी बिपाशा बसूसोबत वाढलेली करणची जवळीक सांगितले जाते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा जेनिफरची खासगी आयुष्यातील निवडक छायाचित्रे...