आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: 34 वर्षांची झाली \'चंद्रमुखी चौटाला\', असे आहे तिचे खासगी आयुष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- चंद्रमुखी चौटाला अर्थातच कविता कौशिक)
मुंबई- छोट्या पडद्यावरील चंद्रमुखी चौटालाला कोण ओळखत नाही. 2006पासून कविता हे पात्र साकारत आहे. या शोसाठी तिला 48पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. मात्र आता हा शो ऑफएअर झाला आहे. परंतु आजसुध्दा कविताला को चंद्रमुखी नावाने ओळखतात. 15 फेब्रुवारी 1981 रोजी जन्मलेली कविता आज 34 वर्षांची झाली आहे. जाणून घेऊया तिच्याविषयी काही गोष्टी...
दिल्लीची रहिवासी आहे कविता-
कविता कौशिकचा जन्म दिल्लीमध्ये एका सीआरपीएफ अधिकारी दिनेशचंद्र कौशिकच्या घरी झाला. अभिनयात येण्यापूर्वी ती मॉडेलिंगमध्ये करिअर घडवण्याचा प्रयत्न करत होती. कॉलेजच्या दिवसांत कविताला इव्हेंट होस्टिंग आणि अँकरींगची आवड होती.
टीव्ही इंडस्ट्रीमध्ये एंट्री-
2001मध्ये एकता कपूरच्या 'कुटुंब' शोसाठी तिने ऑडिशन दिले आणि तिची निवड झाली. त्यानंतर ती या शोसाठी मुंबईमध्ये आली. या शोमधील तिच्या अभिनयाने प्रभावित झालेल्या एकताने तिला 'कहानी घर घर की' आणि 'कुमकुम' मालिकांमध्ये काम करण्यास संधी दिली. शिवाय कविता 'रिमिक्स', 'तुम्हारी दिशा' आणि 'सीआईडी' मालिकांमध्ये दिसली आहे.
एफआयरमधून झाली लोकप्रिय-
कविताने अनेक टीव्ही शो केले आहेत, परंतु तिला 'एफआयआर' मालिकेतून लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये तिने एका हरियाणवी पोलिस इन्सस्पेक्टर चंद्रमुखी चौटालाचे पात्र साकारले होते. हे पात्र इतके लोकप्रिय झाले, की लोकांनी तिला ख-या नावाने नव्हे 'चंद्रमुखी' नावाने ओळखायला लागले. 2013मध्ये तिने हा शो सोडला होता, परंतु प्रेक्षकांच्या मागणीमुळे तिने शोमध्ये पुनरागमन केले.
बॉलिवूडमध्ये पदार्पण-
अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या कविताने काही हिंदी सिनेमातसुध्दा काम केले आहे. 'एक हसीना थी' (2004), 'मुंबई कटिंग' (2009), 'फिलम सिटी' (2011) आणि 'जंजीर'(2013)सारख्या सिनेमांत अभिनय केला आहे . लवकरच ती अनिरुध्द चौटालाच्या पॉलिटीकल व्यंग 'लिलीपॉप सिंस 1947'मध्ये मुख्य साकारत आहे. ती या सिनेमात दीपक डोबरियालच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कविता कौशिकच्या खासगी आयुष्यातील छायाचित्रे...