आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'जस्सी\'ने मिळवून दिली प्रसिध्द, MMSने केली बदनामी, पाहा मोनाचे Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- मोना सिंग)
मुंबई: टीव्ही अभिनेत्री मोना सिंग 33 वर्षांची झाली आहे. 8 ऑक्टोबर 1981 रोजी तिचा जन्म पुण्यात झाला. मोनाची ओळख टीव्हीची जस्सीच्या रुपात होते. मात्र, मोनाने अनेक मालिकांमध्ये आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे. परंतु 2003पासून 2006पर्यंत सोनी टीव्हीवर प्रसारित होणा-या 'जस्सी जैसी कोई नही' तिचा लोकप्रिय शो होता. मालिकांशिवाय मोनाने आमिर खान, शर्मन जोशी आणि आर माधवन अभिनीत '3 इडियट्स' सिनेमात करीना कपूरच्या बहिणीच्या भूमिकेत दिसली होती.
छोट्या पडद्यावर लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्रीचे नाव 2013मध्ये लीक झालेल्या एमएमएस स्कँडलमुळे समोर आले होते. या एमएमएसमध्ये एक मुलगी आपत्तीजनक अवस्थेत दिसत होती आणि सांगितले जात होते, की ही मोना सिंग होती. मात्र मोनाने सांगितले होते, की हा एमएमएस बनावट आहे. पोलिसांनी याचा तपास घेतला मात्र खुलासा होऊ शकला नाही.
आतापर्यंत या मालिकांमध्ये केले काम
'जस्सी जैसी कोई नही' (2003-06, सोनी टीव्ही)
'राधा की बेटिया कुछ कर दिखाएगी' (2008-09, एनडीटीव्ही इमॅजिन)
'क्या हुआ तेरा वादा' (2012-2013, सोनी टीव्ही)
बॉलिवूडच्या या सिनेमांत केला अभिनय
'3 इडियट्स' (2009)
'ऊट पटांग' (2011)
टीव्ही शो 'धलक दिखला जा'ची विजेती
मोना सिंग 'झलक दिखला जा' या डान्सिंग शोच्या पहिल्या पर्वाची विजेती झालेली आहे. त्यानंतर तिने या टीव्ही शोच्या दुस-या आणि चौथ्या पर्वाला होस्ट केले. ती 'एंटरटेन्मेट के लिए कुछ भी करोगा'च्या पाचव्या पर्वाला होस्ट केले आहे. शिवाय, 'फेमिना मिस इंडिया', 'शादी तीन करोड की' आणि 'स्टार या रॉकस्टार'सारख्या टीव्ही शोसुध्दा मोनाने होस्ट केले आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मोना सिंगच्या लाइफमधील काही छायाचित्रे...