आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'Day: 41 वर्षांचा झाला राम कपूर, पाहा त्याच्या खासगी आयुष्यातील Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: अभिनेता राम कपूर पत्नी गौतमीसह)
मुंबई: टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता राम कपूर 41 वर्षांचा झाला आहे. 1 सप्टेंबर 1973 रोजी जन्मलेल्या राम कपूरला एकता कपूरच्या 'बडे अच्छे लगते है' मालिकेतून खरी ओळख मिळाली. सोनी चॅनलवर 2011 आणि 2014दरम्यान प्रसारित होणा-या या मालिकेतसुध्दा त्याच्या पात्राचे नाव राम कपूरच होते. शोमध्ये त्याची आणि साक्षी तंवरची केमिस्ट्री लोकांनी खूप पसंत केली. या मालिकेतून रामने सिध्द केले, की इंडस्ट्रीमध्ये यशस्वी होण्यासाठी स्लिम होण्याची आवश्यकता नसते. मात्र आजचा लठ्ठ राम कपूर एकेकाळी खूप स्लिम होता.
1997पासून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अभिनेता म्हणून काम करणा-या रामला यश आणि लोकप्रियता 2000मध्ये प्रसारित होणा-या 'घर एक मंदिर' मालिकेतून मिळाली. त्याने ‘कसम से ( 2006) आणि 'क्योकि सास भी कभी बहू थी' (2007)सारख्या मालिकांमध्ये काम केले.
'मान्सून वेडिंग' (2000), 'हजारो ख्वाहिशे ऐसी' (2003), 'कार्तिक कॉलिंग कार्तिक' (2010), 'उडान' (2010), 'एक मै और एक तू' (2012), 'एजेट विनोद' (2012), 'स्टूडेंट ऑफ द इअर' (2012), 'मेरे डॅड की मारुति' (2013), 'शादी के साइड इफेक्ट्स' (2014), 'हमशकल्स' (2014)सारख्या सिनेमांत अभिनय केला.
पत्नी आहे टीव्ही अभिनेत्री-
2003मध्ये राम कपूरने टीव्ही अभिनेत्री गौतमी गाडगीळशी लग्न केले. गौतमीने 'घर एक मंदिर' (2000-02), 'लिपस्टिक' (2002-04), 'कहता है दिल' (2002-05), 'क्योकी सास भी कभी बहू थी' (2006-07) आणि 'खेलती है जिंदगी आंख मिचौली' (2013-14) मालिकांत काम केले. याशिवाय ती बॉलिवूड सिनेमांमध्येसुध्दा झळकली आहे. 'कुछ न कहो' (2003), 'फना' (2006) आणि 'स्टूडेंट ऑफ द इअर' (2012) या सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. दोघांना मुलगी सिया आणि मुलगा अक्स अशी दोन मुले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कुटुंबीयांसोबत आणि पेट्ससह राम कपूरची खासगी छायाचित्रे...