आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 43 वर्षांची झाली साक्षी तंवर, अद्यापही आहे लग्नाच्या प्रतिक्षेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साक्षी तंवर - Divya Marathi
साक्षी तंवर
टीव्ही अभिनेत्री साक्षी तंवर 43 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म अलवर राजस्थानमध्ये 12 जानेवारी 1973ला झाला. तिचे वडील राजेंद्रा सिंग तोमर निवृत्त सीबीआय ऑफिसर आहेत. टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री साक्षीने अनेक सिनेमांतही काम केले आहेत. लवकरच ती आमिर खान स्टारर 'दंगल' सिनेमात दिसणार आहे.
अँकरिंगपासून केली करिअरला सुरुवात...
साक्षीने करिअरची सुरुवात दुरर्शनवरील 'अलबेला सुर मेला' या शोमधून केली होती. त्यासाठी तिने ऑडिशनसुध्दा दिले होते.
‘पार्वती’ बनून झाली लोकप्रिय...
साक्षीने 1996मध्ये 'दस्तूर' मालिकेत काम केले, मात्र तिला एकता कपूरच्या 'कहानी घर घर की' मालिकेतून लोकप्रियता मिळाली. या मालिकेत ती 'पार्वती'च्या भूमिकेत होती. त्यानंतर तिने 'देवी', 'बालिका वधू' आणि 'क्राइम पेट्रोल'सारख्या शोमध्ये काम केले. 2011मध्ये 'बडे अच्छे लगते है' मालिकेतून तिने टीव्हीवर यशस्वी पुनरागमन केले. 'प्रिया कपूर'च्या पात्रात तिला पसंत केल्या गेले.
सिनेमांतही केला अभिनय...
20 वर्षांच्या करिअरमध्ये साक्षीने अनेक सिनेमांत काम केले. त्यामध्ये ‘कॉफी हाउस’, ‘बावरा मन’, ‘सलून’ आणि ‘कही दूर’ हे सिनेमे सामील आहेत.
वयाच्या 43व्या वर्षीदेखील सिंगल...
43 वर्षांची झालेली साक्षी अद्याप अविवाहित आहे. मात्र अनेकदा तिच्या लिंकअप्स आणि लग्नाच्या बातम्या समोर आल्या आहेत. मात्र नंतर या बातम्या अफवा असल्याचे सांगण्यात आले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा साक्षीचे निवडक फोटो...