आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'Day: 25 वर्षांची झाली टीव्ही स्टार सारा खान, पाहा खासगी आयुष्यातील निवडक Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सारा खान)
मुंबई: 'सपना बाबुल का...बिदाई' आणि 'राम मिलाये जोडी'सारख्या टीव्ही मालिकांमध्ये झळकलेली टीव्ही अभिनेत्री सारा खान आज (6 |ऑगस्ट) 25 वर्षांची झाली आहे. 6 ऑगस्ट 1989 रोजी साराचा जन्म मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे झाला.
2007मध्ये स्टार प्लसच्या 'सपना बाबुल का' या लोकप्रिय मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या शोमध्ये ती मुख्य भूमिकेत होती. शोमधील तिच्या पात्राचे नाव साधना आलेख राजवंश होते. तिच्याविषयी आणखी जाणून घेऊया...
2007मध्ये मिळाला मिस भोपाळचा खिताब
मॉडेलिंग आणि अभिनयाच्या जगात करिअर करणा-या सारा खानने 2007मध्ये मिस भोपाळचा खिताब आपल्या नावी केला होता. त्यानंतर मध्यप्रदेश दूरदर्शन आणि ईटीव्हीवर सूत्रसंचालन करताना तिला सर्वांनी पाहिले. तसेच 2007मध्येच तिच्यासाठी अभिनयाचे दार खुले झाले.
तिने दिग्दर्शक राजन साहनी रोमेश कालरा आणि सुनंद कुमार यांच्या '...बिदाई' या प्रसिध्द टीव्ही शोमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. ही मालिका तीन वर्षांपर्यंत चालली आणि (2007-2010) लोकप्रिय मालिकांपैकी एक होती.
2008मध्ये या शोसाठी तिला आणि को-स्टार अंगदला 'स्टार परिवार'च्या प्रसिध्द कपल अवॉर्डसाठी नोमिनेट करण्यात आले. यावर्षी '...बिदाई'साठी तिला इंडियन टेली अवॉर्ड्स (उत्कृष्ट नवोदित अभिनेत्री) देण्यात आला.
आतापर्यंत या शोमध्ये झळकली आहे सारा:
'सपना बाबुल का... बिदाई' (2007-2010)
टीव्ही शो 'बिग बॉस-4' (2010, कंटेस्टेंट)
'राम मिलाये जोडी' (2012-2013)
टीव्ही शो 'वेलकम -बाजी मेहमान-नवाजी की' (2013, कन्टेस्टेंट)
'एन्काऊंटर' (2014)

या सिनेमांमध्ये केले काम:

'टोटल सियापा' (2014)
एम3- मिडसमर मिडनाइट मुंबई (2014)

लग्नावर वाद
2010मध्ये सारा खानने 'बिग बॉस 4'दरम्यान स्पर्धक अली मर्चंटसह लग्नगाठीत अडकली होती. तेव्हा ती वादाच्या भोव-यात अडकली होती. मात्र एकाच वर्षात त्यांचे वैवाहिक आयुष्य संपुष्टात आले. त्यानंतर दोघांच्या जवळच्या मित्रांनी खुलासा केला होता, की लग्नासाठी त्यांना 50 लाख रुपये देण्यात आले होते. मात्र चॅनलने या गोष्टीला स्पष्ट नकारत सांगितले होते, की हे लग्न सारा आणि अली यांच्या सहमतीने लावले होते. तसेच, अली मर्चंटने 'सच का सामना' या टीव्ही शोमध्ये सांगितले होते, की त्यांनी पब्लिसिटीसाठी हे लग्न केले होते. त्याच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी चुक होती.
सारा खानच्या खासगी आयुष्यातील काही निवडक छायाचित्रे तुम्ही बघू शकता पुढील स्लाइड्सवर...