आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्ट्रेसने \'ती\' जाहिरात केल्याबद्दल तब्बल 12 वर्षानंतर व्यक्त केली खंत, मागितली माफी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई. 'जस्सी जैसी कोई नहीं', 'कसौटी जिंदगी की' या मालिकांमध्ये झळकलेली टीव्ही अभिनेत्री सोनल सहगल हिने 13 जुलै रोजी वयाची 36 वर्षे पूर्ण केली आहेत. 2003 साली 'सारा आकाश' या मालिकेद्वारे सोनलने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. सोनमने 12 वर्षांपूर्वी एक फेअरनेस सोपची जाहिरात केली होती. ही जाहिरात केल्याची खंत व्यक्त करत तिने एप्रिल 2017 मध्ये माफी मागितली होती. अॅडप्रमाणेच सोनमने एक व्हिडिओ तयार करुन त्याच्या माध्यमातून प्रेक्षकांची माफी मागितली. 

काय होते माफी मागण्यामागचे कारण...  
- मॉडेल ते अभिनेत्री असा करिअर प्रवास करणा-या सोनलने फेअरनेस सोपची जाहिरात केल्यामुळे माफी मागितली. कारण ही जाहिरात करुन मी वर्णभेदाला चालना दिली, असे तिने म्हटले होते. 
- सोनल म्हणाली होती, नकळत माझ्या हातून वर्णभेद पसरवण्याचे काम झाले.
- 12 वर्षांपूर्वी ती एका फेअरनेस साबणाच्या जाहिरातीत झळकली होती. यावर ती म्हणाली, "12 वर्षांपूर्वी मी मुंबईत पहिले पाऊल ठेवले होते. त्यावेळी मला माझी पहिली जाहिरात मिळाली. ती रंग उजळवणा-या साबणाची जाहिरात होती."
- "या जाहिरातीत काम करुन मी वर्षभराचे घराचे भाडे भरु शकेल, एवढे पैसे कमावले होते."
- "माझे केवळ एक काम म्हणून मी सुरुवातीला या जाहिरातीकडे पाहिले होते. पण जेव्हा माझ्या घरी काम करणा-या गंगूने मला विचारले, तुमच्यासारखे गोरे होण्यासाठी कुठली साबण वापरु? तिने हा प्रश्न विचारला, तेव्हा माझे डोळे उघडले. मी गंगू आणि गंगूसारख्या कित्येक स्त्रियांसोबत अन्याय केला, याची मला जाणीव झाली."
- त्या जाहिरातीवर माफी मागताना सोनलने फेसबुकवर लिहिले होते, की दीर्घ काळानंतर मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. माझ्यामुळे कोट्यवधी सावळ्या तरुणींचा आत्मविश्वास डळमळला असेल. 

वाचनाची आहे सोनलला आवड...
- सोनल सहगल स्वतःला किताबी किडा म्हणते.
- सोनल  सांगते, की तिच्याजवळ पुस्तकांचा खजिना आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिचे घर रिनोव्हेट केले होते. तेव्हा घरात पुस्तकांसाठी तिने एक मोठी जागा करुन घेतली.
- सोनलला आत्मचरित्र वाचणे पसंत आहे.
- ती सांगते, "मी चार्ली चैप्लिन, आंद्रे अगासी, अर्नाल्ड स्वाजनेगर या दिग्गज व्यक्तींच्या
बायोग्राफी वाचल्या आहेत."
 
या टीव्ही शोजमध्ये झळकली आहे सोनल...
- सोनलने तिच्या अॅक्टिंग करिअरची सुरुवात 2003 साली 'सारा आकाश' या मालिकेतून केली होती. 
- नंतर ती 'कसौटी जिंदगी की'(2001), 'जस्सी जैसी कोई नहीं'(2003) आणि 'हॉटेल किंग्स्टन'(2005) या शोजमध्ये झळकली.
- टीव्ही शोजसोबत सोनलने 'यू-बौमसी एंड मी'(2005), 'रेडियो'(2009), 'जाने कहां से आई है'(2010), 'आशाएं'(2010), 'दमादम'(2011), 'फ्यूचर तो ब्राइट है जी'(2012) हे सिनेमेदेखील केले. 
- सोनलचा 'मंटोस्तान' हा सिनेमा 5 मे 2017 रोजी रिलीज झाला.  
 
पुढील स्लाईड्समध्ये बघा, सोनलचे 5 Latest Photos...
बातम्या आणखी आहेत...