आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: खासगी आयुष्यात अशी बिनधास्त आहे ही छोट्या पडद्यावरची सोज्वळ सून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोट्या पडद्यावरची सोज्वळ सून म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सारा खान हिचा आज वाढदिवस आहे. 'सपना बाबूल का... बिदाई' या मालिकेद्वारे सना छोट्या पडद्यावर अवतरली खरी मात्र तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती 'बिग बॉस' या शोमूळे. या शोमध्ये सनाने अली मर्चंटसोबत खोटे लग्न थाटून भरपूर चर्चा एकवटली होती. शोच्या चौथ्या पर्वात तिने तिचा माजी प्रियकर अली मर्चंटसह चक्क लग्न थाटले होते. शो संपताच त्यांचे लग्नसुद्धा मोडले. या लग्नासाठी म्हणे दोघांना 50 लाख रुपये मिळाले होते.
असो, पडद्यावर अगदी सोज्वळ रुपात दिसणारी सारा खासगी आयुष्यात मात्र चांगलीच बिनधास्त आहे. ही 26 वर्षीय अभिनेत्री पार्टीत मद्यधुंद अवस्थेत अनेकदा आढळली आहे. इतकेच नाही सार्वजनिक ठिकाणी केवळ बॉयफ्रेंडलाच नव्हे तर तिची मैत्रीण आणि अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीलाही ती किस करताना दिसली आहे.
एकंदरीतच साराचे खासगी आयुष्य बघता ती मुळीच पडद्यावर साकारत असलेल्या सोज्वळ व्यक्तिरेखांसारखी नाही, असेच म्हणता येईल.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा, खासगी आयुष्यात कशी बिनधास्तपणे जगते सारा..