आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bobby Deol, Sohail Khan, Sanjeeda Shaikh, Vatsal Sheth At Ek Hasina Thi Premiere

\'एक हसीना थी\'च्या प्रीमिअरला पोहोचले बॉबी आणि सोहेल, बघा PIX

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'नच बलिये 3'ची विजेती संजिदा शेख पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतत आहे. तिची प्रमुख भूमिका असलेली 'एक हसीना थी' ही मालिका स्टार प्लस वाहिनीवर दाखल होत आहे. या मालिकेत संजिदासह अभिनेता वत्सल सेठ महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.
यानिमित्ताने अलीकडेच मुंबईत या मालिकेचा प्रीमिअर सोहळा आयोजित करण्यात आला होता. संजिदा आणि वत्सलला त्यांच्या या नवीन मालिेकेसाठी शुभेच्छा द्यायला अभिनेता बॉबी देओल आणि सोहेल खान यांनी खास उपस्थिती लावली होती. या प्रीमिअरमध्ये संजिदा तिचे पती आमिर अलीसह दिसली. याशिवाय अयूब खान, सिमोन सिंह, अमित बहल आणि भूपिंदर सिंहसुद्धा यावेळी उपस्थित होते.
एक हसीना थी ही मालिा थ्रिलर ड्रामा असून प्रेम कृष्ण या मालिकेचे निर्माते आहेत. या मालिकेत संजिदाने दुर्गा नावाच्या तरुणीची भूमिका साकारली आहे. ही तरुणी भूतकाळात घडलेल्या एका अपराधासाठी न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता वत्सल सेठ छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे.
या मालिकेत स्टार्स साकारत आहेत या भूमिका -
* संजीदा शेखः दुर्गा ठाकुरची भूमिका साकारत आहे.
* वत्सल सेठः शौर्या गोएनकाच्या भूमिकेत आहे.
* अयूब खानः राजनाथ गोएनकाच्या भूमिकेत.
* अमित बहलः राजनाथच्या आर्थिक सल्लागाराच्या भूमिकेत आहे.
* भूपिंदर सिंहः दुर्गाच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'एक हसीना थी'च्या प्रीमिअर सोहळ्यात सहभागी झालेल्या स्टार्सची खास छायाचित्रे...