'सत्यमेव जयते'च्या पहिल्या भागात अखिलेश या अल्पवीयन मुलाची फुटबॉलच्या माध्यमातून अंमली पदार्थाच्या व्यसनातून सुटका झाल्याचे अनुभवकथन यातून करण्यात आले. याशिवाय हरियाणातील गोल्ड मेडल विजेत्या बबिता कुमारी, गीता कुमारी यांचा विजेतेपदापर्यंतचा संघर्षमय प्रवास मांडण्यात आला. शिवाय 'मॅजिक बस' या संस्थेने कशाप्रकारे गरीब मुलांचे आयुष्य बदलले यावरही प्रकाश टाकण्यात आला. या संस्थेत सहभागी असलेल्या मुलांनी
आपले अनुभव यावेळी कथन केले. या संस्थेचे संस्थापक मॅथ्यू या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या कार्यक्रमातील सायना नेहवाल या बॅडमिंटनपटूची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा फोनवरून संवाद हे या भागाचे वैशिष्ट्य ठरले. सचिनने या कार्यक्रमाचे
फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून कौतुक केले. सचिन म्हणाला, ''ज्या दिवशी खेळाचा समावेश हा प्रत्येक भारतीयांच्या आयुष्याचा एक भाग होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने भारताच्या भविष्यात सुधारणा होईल.''
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'सत्यमेव जयते'च्या तिस-या पर्वाच्या पहिल्या भागाचा व्हिडिओ...
[व्हिडिओ सौजन्यः स्टार प्लस वाहिनी आणि सत्यमेव जयते ऑफिशिअल वेबसाइट]