आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Akshay Kumar Promote His Film Holiday In Comedy Nights With Kapil

\'कॉमेडी नाइट्स...\'च्या सेटवरील अक्कीची मस्ती पाहून कपिलच झाला लोटपोट, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कपिल शर्माच्या लोकप्रिय 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोमध्ये अलीकडेच अभिनेता अक्षय कुमारने हजेरी लावली होती. येथे अक्षय आपल्या आगामी 'हॉलिडे' या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने आला होता. या सिनेमात अक्षयसह सोनाक्षी सिन्हा मेन लीडमध्ये आहे. प्रमोशनवेळी मात्र सोनाक्षी गैरहजर दिसली. त्यामुळे अक्षयने एकट्यानेच प्रमोशनची धुरा सांभाळली होती.
'कॉमेडी नाइट्स..'च्या सेटवर अक्षयने बिट्टू (कपिल शर्मा)च्या कुटुंबीयांसह भरपूर धमाल मस्ती केली. पलक आणि अक्षय यांच्यात कराटेचा सामना रंगला. अक्षयने दादीसोबतही भरपूर धमाल केली. दादीने अक्षयला 'शगुन की पप्पी'सुद्धा दिली. यावेळी अक्षयने आपल्या चाहत्यांनासुद्धा मार्शल आर्टचे धडे दिले. अक्षयची धमाल-मस्ती पाहून उपस्थित प्रेक्षकांसह सिद्धू पाजी आणि कपिल शर्मा हसून लोटपोट झाले होते.
अक्षयच्या 'हॉलिडे' या आगामी सिनेमात सोनाक्षी सिन्हा बॉक्सरच्या भूमिकेत आहे, तर अक्षयने सिनिअर कमांडरची भूमिका साकारली आहे. सोनाक्षी आणि अक्षयसह गोविंदाचीही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहे. हॉलिडे हा थुपक्की या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक असून 'गजनी' फेम आर. मुरगदास यांनी सिनेमा दिग्दर्शित केला आहे. येत्या 6 जून रोजी सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अक्षयची कॉमेडी नाइट्स विथ कपिलच्या सेटवरील धमाल-मस्ती...