आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Sahil Khan To Enter In Bigg Boss 9

जॅकी श्रॉफच्या पत्नीने याला म्हटले होते \'गे\', \'Bigg Boss 9\'मध्ये करू शकतो एंट्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पूर्वाश्रमीची पत्नी निगार खानसोबत साहिल खान आणि जॅकी श्रॉफ पत्नी आयशा श्रॉफसोबत)
 
मुंबई-
बॉलिवूड अभिनेता साहिल खान लवकरच वादग्रस्त रिअॅलिटी शो \'बिग बॉस डबल ट्रबल\'मध्ये दिसणार आहे. बातमी आहे, की साहिल वाइल्ड कार्ड एंट्रीमध्ये \'बिग बॉस\'मध्ये येणार आहे. हाच तो साहिल खान आहे, ज्याच्यावर जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयशा श्रॉफने 5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप लावला होता. 
 
आयशाने म्हटले होते \'गे\' 
साहिलने दावा केला होता, की त्याचे आयशा श्रॉफसोबत अफेअर सुरु आहे, तेव्हा फसवणूकीच्या प्रकरणात नवीन टि्वस्ट आला होता. साहिलच्या या दाव्याचे खंडन करून आयशाने त्याला \'गे\' म्हटले होते. मागील वर्षी डिसेंबरमध्ये तिने सत्रन्यायालयात साहिलच्या दाव्याला चूकीचे सांगितले आणि साहिल एक \'समलैंगिक पुरुष आहे\' असेही म्हणाली होती. असे असेल तर दोघांचे अफेअर कसे असू शकते. इतकेच नव्हे, बातम्यांनुसार, आयशाने दावा केला होता, की साहिल \'गे\'च नव्हे तर त्याच्या पत्नीने त्याला सोडून दिले आहे आणि दोघांचा घटस्फोट झाला आहे. आयशाच्या सांगण्यानुसार, साहिलच्या पत्नीने त्याला एका व्यक्तीसोबत आपत्तीजनक अवस्थेत पाहिले होते. 
 
निगार खानसोबत झाले होते लग्न- 
साहिलचे लग्न 2004मध्ये ईराणच्या वंशाची अभिनेत्री निगार खानसोबत लग्न झाले होते. मात्र एकाच वर्षात म्हणजे 2005मध्ये दोघे विभक्त झाले. निगारने \'रुद्राक्ष\' (2004), \'शादी का लड्डू\' (2004), \'ताज महल : एक इटरनल लव स्टोरी\' (2005) आणि \'शॉर्टकट\' (2009)सारख्या बॉलिवू़ड सिनेमांत काम केले आहे. 
 
\'स्टाइल\'सारख्या सिनेमांचा नायक आहे साहिल खान- 
साहिल खानने 2001मध्ये एन. चंद्राच्या \'स्टाइल\' बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यानंतर तो या सिनेमाच्या सीक्वेल \'एक्सक्यूज मी\' (2002)मध्ये दिसला होता. 2009मध्ये त्याने अमिताभ बच्चन, रितेश देशमुख आणि जॅकलीन फर्नांडिस स्टारर \'अलादीन\' सिनेमातसुध्दा काम केले होते. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा साहिल खानचे जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयशा, मुलगी आणि मुलाशिवाय पूर्वाश्रमीची पत्नीसोबतचे निवडक फोटो...