आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood And TV Stars Spotted At Star Valentine Day Event

PHOTOS:व्हॅलेंटाइन डे इव्हेंटमध्ये जॅकलिन, वरुणसह पोहोचले अनेक सेलेब्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः दिव्यांका त्रिपाठी, जॅकलिन फर्नांडिस आणि वरुण धवन)
मुंबईः बॉलिवूड आणि टेलिव्हजन स्टार्स अलीकडेच एकत्र जमले होते. निमित्त होते 'मुस्कुराने की वजह तुम हो' या व्हॅलेंटाइन डे कार्यक्रमाचे. मुंबईतील फिल्मसिटीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी टीव्ही स्टार्ससोबतच बॉलिवूड सेलिब्रिटींनीसुद्धा धमाकेदार परफॉर्मन्सेस सादर केले.
वरुण धवन, जॅकलिन फर्नांडिस आणि अर्जुन रामपाल यांनी येथे आपापल्या आगामी सिनेमांचे प्रमोशन केले. टेलिव्हिजन जगतातील प्रसिद्ध स्टार्स यावेळी रेड कार्पेटवर अवतरले होते. दिव्यांका त्रिपाठी, करण जोहर, करण पटेल, कुंवर अमर, शक्ति मोहन, मिहिका वर्मासह बरेच स्टार्स या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
आगामी 'बदलापूर'च्या सिनेमासाठी प्रमोशनसाठी पोहोचलेला अभिनेता वरुण पिंक टीशर्ट आणि ब्लॅक ब्लेजरमध्ये दिसला. तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि अर्जुन रामपाल त्यांचा 13 फेब्रुवारी रोजी रिलीज होणा-या 'रॉय'चे प्रमोशन करताना दिसले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा स्टार व्हॅलेंटाइन डे इव्हेंटची ही खास छायाचित्रे...