आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BUZZ: आमनाकडे आहे गोड बातमी, दीड वर्षांपूर्वी अडकली होती विवाहबंधनात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(निर्माता आणि पती अमित कपूरसोबत आमना शरीफ)
मुंबई- 'कही तो होगा' मालिकेतून लोकप्रिय झालेली टीव्ही अभिनेत्री आमना शरीफ आई होणार आहे. ही बातमी आहे तिच्या एका फ्रेंडने एका प्रतिष्ठीत वेबसाइटला दिली आहे. फ्रेंडच्या सांग्यानुसार, 'आमना मागील काही दिवसांपासून पाली हिल येथील एका डॉक्टरकडे चाचण्या करण्यासाठी जात आहे. तिला याविषयी काहीच सांगायचे नाहीये. परंतु ती गर्भवती असून लवकरच गोड बातमी देणार आहे.'
दीड वर्षांपूर्वी झाले होते लग्न-
आमना शरीफच्या लग्नाला जवळपास दीड वर्षे झाली आहेत. तिने 27 डिसेंबर 2013 रोजी निर्माता अमित कपूरसोबत लग्न केले होते. अमितने 'वन बाय टू' (2014), 'रॉक द शादी' आणि 'मै और चार्ल्स'सारखे सिनेमे निर्मित केले आहेत. अमित निर्माता शबनम कपूरचा मुलगा आहे. शबनम कपूरने शाहरुख खानचा 'दीवाना' निर्मित केला होता.
मुंबईमध्ये झाला जन्म
आमना शरीफचा जन्म 16 जुलै 1982 रोजी मुंबईमध्ये झाला. तिचे वडील भारतीय तर आई पार्शिअन आहे. मुंबईच्या वांद्रा स्थित सेंट ऐनीज या शाळेत आमनाचे शिक्षण पूर्ण झाले.
2003मध्ये बॉलिवूड पदार्पण-
आमनाने 2003मध्ये एकता कपूरच्या 'कही तो होगा' या मालिकेतू छोट्या पडद्यावर एंट्री केलीय स्टार प्लसवर प्रसारित झालेली मालिकेत साकारलेले पात्र कशिश ग्रेवाल प्रेक्षकांना भावले होते. तिची लोकप्रियता इतकी वाढली होती, की या नावाच्या साड्या आणि ड्रेसेस मार्केटमध्ये उपलब्ध झाले होते. 'कहीं तो होगा' शिवाय, आमनाने 'होंगे जुदा न हम' (2012-13) आणि 'एक थी नायिका' (2013)मध्येसुध्दा काम केले आहे.
सिनेमांतसुध्दा दिसली आहे आमना-
आमना छोट्या पडद्यावरच नव्हे रुपेरी पडद्यावरसुध्दा झळकली आहे. ती बॉलिवू़मध्येसुध्दा नशीब आजमावत आहे 2009मध्ये आलेला दिग्दर्शक रॉबू ग्रेवालचा 'आलू चाट' सिनेमात आमनाची मुख्य भूमिका होती. त्यानंतर आओ विश करे' (2009) और 'शक्ल पे मत जा' (2011)मध्ये तिने काम केले आहे. मागील वर्षी रिलीज झालेल्या सिध्दार्थ कपूर, श्रध्दा कपूर आणि रितेश देशमुख अभिनीत 'एक व्हिलेन'मध्येसुध्दा आमनाची महत्वाची भूमिका होती.
अभिनेत्री ते रॅम्पवॉकसुध्दा-
आमना शरीफ केवळ अभिनेत्रीच नव्हे मॉडेलसुध्दा आहे. महाविद्यालयात असताना आमनाने मॉडेलिंगला सुरुवात केली होती. तेव्हापासून आमना प्रसिघ्द ब्रँडमध्ये काम करत आहे. क्लोज-अप टूथपेस्ट, इमामी कॉस्मेटिक क्रिम और नेस्कॅफेासारख्या अनेक ब्रँड्समध्ये आमना झळकली आहे. कुमार सानूच्या 'दिल का आलम मै क्या बताऊ तुझे', फाल्गुनी पाठकच्या 'किसने जादू किया' आणि अभिजीत भटाचार्याच्या 'चलने लगी है हवाएं'सारख्या म्यूझिक व्हिडिओमध्ये आमनाने काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आमनाच्या खासगी आयुष्य़तील खास फोटो...