आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

INSIDE PHOTOS: मुंबईतील या छोट्याशा घरात वास्तव्याला आहे 'उतरन' फेम 'इच्छा'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुंबईतील आपल्या घरात बालकलाकार स्पर्श खानचंदानी)
मुंबई- छोट्या पडद्यावर गाजलेल्या 'उतरन' या मालिकेत इच्छा हे पात्र साकारुन प्रसिद्धीझोतात आलेली बालकलाकार म्हणजे स्पर्श खानचंदानी. मुंबईतील उल्लासनगरमध्ये स्पर्श वडील आणि आईसोबत वास्तव्याला आहे. स्पर्शची आई वकील आहे. Divyamrathi.com सोबत केलेल्या बातचितमध्ये स्पर्शने आपल्या घराविषयी सांगितले.
स्पर्श म्हणाली, "माझे घर तसे लहान आहे. आम्ही गेल्या चार वर्षांपासून येथे वास्तव्याला आहोत. घरातील मोठी जागा म्हणजे याचा हॉल आहे. येथे छोटीशी लायब्ररीसुद्धा आम्ही तयार केली आहे. येथे तासन्तास बसून अभ्यास करणे मला पसंत आहे. मी खाण्याची शौकीन आहे. त्यामुळे माझी दुसरी आवडती जागा ही किचन आहे. येथे मी पास्ता, पिज्झा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेश आईच्या मदतीने बनवण्याचा प्रयत्न करत असते. घरातील प्रत्येक कोप-यात माझ्या ब-याच आठवणी असून येथे मला सकारात्मक ऊर्जा मिळते."
या मालिकांमध्येही झळकली आहे स्पर्श...
>>परवरिश : कुछ खट्टी कुछ मीठी
>>जरा नचके दिखा (डान्सिंग रिअॅलिटी शो)
>>गुलाल
>>सीआईडी
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, स्पर्श खानचंदानीची घरातील इनसाइड छायाचित्रे...