आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'गधा प्रसाद\'च्या रिसेप्शनमध्ये थिरकल्या \'चिडियाघर\'च्या या अॅक्ट्रेसेस, पोहोचले अनेक सेलेब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्वेता आणि जीतूच्या रिसेप्शनमध्ये  \'चि़डियाघर\' मधील अभिनेत्री कोयल (आदिति साजवान) आणि मयूरी (शफक नाज) - Divya Marathi
श्वेता आणि जीतूच्या रिसेप्शनमध्ये \'चि़डियाघर\' मधील अभिनेत्री कोयल (आदिति साजवान) आणि मयूरी (शफक नाज)
मुंबईः अलीकडेच मुंबईत 'चिडियाघर' या विनोदी मालिकेत गधा प्रसाद उर्फ जीतू शिवहरेचे वेडिंग रिसेप्शन झाले. यावेळी मालिकेची संपूर्ण स्टारकास्ट जीतू शिवहरेला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचली होती. याशिवाय रतन राजपूत, संजय मिश्रा, शैलेश लोढा, रोहिताश गौड, आसिफ शेख, गोपी भल्ला, संदीप आनंद, रेशम टिपनिस आणि सूरज थापरसह अनेक सेलेब्स पार्टीत पोहोचले होते. रिसेप्शनमध्ये 'चिडियाघर' या मालिकेत झळकणा-या कोयल (आदिती साजवान) आणि मयुरी (शफक नाज) यांनी भरपूर डान्स मस्ती केली.

याचवर्षी जुलै महिन्यात झाले जीतूचे लग्न...
जीतूचे लग्न याचवर्षी जुलै महिन्यात लखनऊच्या श्वेता जायस्वालसोबत झाले. जीतू शूटिंगच्या निमित्ताने लखनऊला गेले असताना दोघांची भेट झाली होती. येथेच एका मित्राने जीतूला श्वेताचे छायाचित्र लग्नासाठी दाखवले होते. जीतूने सांगितले, "माझा एक मित्र कुंडली जुळवण्यात एक्सपर्ट आहे. त्यानेच मला श्वेताचा फोटो दाखवला आणि कुंडली जुळवली. गुण मिळाल्यानंतर माझ्या आईवडिलांनी श्वेताला लग्नासाठी फायनल केले."

7 जुलै 2016 रोजी लखनऊ येथे दोघांचा साखरपुडा झाला आणि त्यानंतर 13 जुलै रोजी शिर्डीत दोघांचे लग्न झाले.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, जीतूच्या वेडिंग रिसेप्शनचे PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...