आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TV अभिनेत्रीच्या B\'day पार्टीत थिरकली सनी लिओनी, अनेक सेलेब्स पोहोचले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री माही विज हिच्या बर्थडे पार्टीत सहभागी झालेले सेलिब्रिटी)
मुंबईः टीव्ही अभिनेता जय भानूशालीची पत्नी आणि टीव्ही अभिनेत्री माही विज हिचा 1 एप्रिल रोजी वाढदिवस होता. माहीने वयाची 33 वर्षे पूर्ण केली. पत्नीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जय भानूशालीने बुधवारी रात्री मुंबईत एक जंगी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत सनी लिओनी आणि तिचे पती डेनियल वेबर, अंकिता लोखंडे, रश्मी देसाई आणि किकू शारदासह अनेक सेलेब्स सहभागी झाले होते. या पार्टीत सनी लिओनी ताल धरताना दिसली.
माहीने 2009-2012 या काळात छोट्या पडद्यावर प्रसारित झालेल्या लागी तुझसे लगन या मालिकेत काम केले होते. याशिवाय 'अकेला' (2007-2008), 'तेरी मेरी लव स्टोरीज' (2012) आणि 'एनकाउंटर' (2014) या मालिकांमध्येही तिने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. 'झलक दिखला जा सीजन 4' आणि 'नच बलिए 5' (2012-13) या डान्स रिअॅलिटी शोमध्ये तिने आपल्या नृत्याची झलक दाखवली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा माही विजच्या बर्थडे बॅशची खास झलक...