आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'बिभीषण' फेम मुकेश रावल यांची शोकसभा : दिसले नाहीत 'राम-लक्ष्मण', मुलींचा फुटला अश्रूंचा बांध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुकेश रावल यांची थोरली मुलगी विप्रा रावलचे सांत्वन करताना नातेवाईक. - Divya Marathi
मुकेश रावल यांची थोरली मुलगी विप्रा रावलचे सांत्वन करताना नातेवाईक.
मुंबईः रामानंद सागर यांच्या गाजलेल्या 'रामायण' या मालिकेत बिभीषण ही भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश रावल यांच्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 'तारक मेहता का उल्टा चश्मा'चे निर्माते असित मोदी, 'बा बहू और बेबी' फेम सरिता जोशी आणि 'FIR' फेम शेखर शुक्ला आणि 'खिचडी' फेम अनंग देसाईसह काही निवडक कलाकारांनी उपस्थिती लावून शोकसभेत मुकेस रावल यांना श्रद्धांजली वाहिली. मात्र 'रामायण' या मालिकेत त्यांच्यासोबत काम करणारे अरुण गोविल (राम), दीपिका चिखलिया (सीता), सुनील लहरी (लक्ष्मण) आणि अरविंद त्रिवेदी (रावण) सह सर्वच स्टार्स यावेळी अनुपस्थित होते. रेल्वे रुळावर आढळले होते मुकेश रावल यांचे पार्थिव...

15 नोव्हेंबर रोजी मुकेश रावल यांचा मृतदेह कांदिवली स्टेशनजवळील रेल्वे रुळावर आढळला होता. ते घरातून बँकेतून पैसे काढण्यासाठी बाहेर पडले होते. असे म्हटले जाते, की त्यानंतर ते घाटकोपला डबिंगसाठी जाणार होते. मात्र 24 तासांनंतरही ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी कांदिवली पोलिस स्टेशनसोबत संपर्क साधला होता. त्यानंतर मुकेश रावल यांची ओळख पटली होती.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, मुकेश रावल यांच्या शोकसभेची छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...