आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्टार परिवार अवॉर्ड्स नाइटमध्ये आमिरसह पोहोचले TV स्टार्स, पाहा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून जेनिफर विंगेट, अनिता हसनंदानी आणि आमिर खान)
मुंबई - रविवारी रात्री मुंबईत स्टार परिवार अवॉर्ड्स सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वरळीस्थित एनएससीआय ग्राऊंडमध्ये हा अवॉर्ड सोहळा संपन्न झआला. यावेळी टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरे येथे दिसले.
जेनिफर विंगेट, दीपिका सिंह, अनस राशिद, मोनिका बेदी, अदा खान, करण पटेल, संजीदा शेख, आमिर अली, विशाल सिंह, देवोलीना भट्टाचार्जी यांच्यासह अनेक टीव्ही स्टार्स रेड कार्पेटवर अवतरले होते. या अवॉर्ड्स सोहळ्याचा आकर्षणबिंदू ठरला आमिर खान. आमिर पत्नी किरण रावसह या अवॉर्ड सोहळ्यात हजर होता. शिवाय श्रेयस तळपदे, परिणीती चोप्रा यांनीही या सोहळ्याला आपली उपस्थिती लावली होती.
यावेळी अनेक टीव्ही स्टार्सनी आपल्या परफॉर्मन्सनी सोहळ्याला चारचाँद लावले. हा सोहळा येत्या 29 जून रोजी संध्याकाळी 7.30 वाजता स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
स्टार परिवारातर्फे दरवर्षी या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. 2003 पासून या सोहळ्याला सुरुवात झाली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा स्टार परिवार अवॉर्ड्स 2014च्या रेड कार्पेटवर अवतरलेल्या टीव्ही आणि बॉलिवूड स्टार्सची खास झलक...