आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebs Who Should Be Part Of The Bigg Boss Season 8

BIGG BOSS 8 मध्ये अॅडल्ट स्टार शांतीची एन्ट्री? जाणून घ्या, कोण असतील पाहुणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मॉडेल लूलिया वंतूर आणि 'गुत्थी'च्या गेटअपमध्ये विनोदवीर सुनील ग्रोवर)
मुंबई - छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त शो म्हणून ओळखला जाणा-या 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोचे आठवे पर्व लवकरच सुरु होणार आहे. या पर्वात शोमध्ये कोणकोणते सेलिब्रिटी सहभागी होणार याविषयी नक्कीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
यापूर्वी शोचा होस्ट सलमान खानने आठव्या पर्वाचे सूत्रसंचालन करण्यास वाहिनीला आपला नकार कळवला होता. त्यामुळे शोचा होस्ट म्हणून अक्षय कुमार आणि शाहरुख खान या अभिनेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र वाहिनीला सलमानची मनधरणी करण्यात यश मिळाले असून तोच या पर्वाचाही होस्ट असणार आहे. आता होस्ट म्हणून सलमानच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे आता उत्सुकता आहे ती शोमध्ये सहभागी होणा-या पाहुण्यांविषयी..
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमानची एक्स गर्लफ्रेंड म्हणून ओळखली जाणारी परदेशी अभिनेत्री लुलिया वंतूर, अॅटल्ट स्टार शांती डायनामाइट, कुमार विश्वास, जॅकी श्रॉफ, आलोकनाथ, रॅपर हनी सिंह, कॉमेडिअल सुनील ग्रोवर हे सेलिब्रिटी शोमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाईड्मध्ये सविस्तर जाणून घ्या 'बिग बॉस'च्या आठव्या पर्वात सहभागी होऊ शकणा-या सेलिब्रिटींविषयी...