आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमांचे उल्लंघन केल्याने पुनीत घराबाहेर, यांचीसुध्दा झाली होती Bigg Bossमधून हकालपट्टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- पुनीत इस्सर आणि पूजा मिश्रा)
'बिग बॉस'च्या घरातून पुनीत इस्सरला बाहेर काढण्यात आले आहे. अलीकडेच, लग्जरी बजेट टास्कदरम्यान पुनीतने आर्य बब्बरच्या विरोधात शारीरिक ताकदीचा वापर केला होता. 'बिग बॉस'च्या घरातील नियम आणि कायद्यांनुसार, हाऊसमेट्स आपसात हाथापाई करू शकत नाहीत. या नियमा अंतर्गत पुनीतला घराबाहेर काढण्यात आले आहे.
यापूर्वीच्या पर्वात अनेक स्पर्धकांचीसुध्दा नियम तोडल्याने घराबाहेर हाकालपट्टी करण्यात आली होती.
पूजा मिश्रा-
मॉडेल पूजा मिश्रासुध्या या शोची सर्वात वादग्रस्त स्पर्धक मानली जात होती. शोच्या 5व्या पर्वात सर्वात जास्त भांडण झाले होते. छोट्या-छोट्या गोष्टींवर भडकणा-या पूजाला को-कंटेस्टेन्ट सिध्दार्थसोबत भांडण केल्याने घराबाहेर जावे लागले होते. तिच्यावर सिध्दार्थ भारव्दाजवर हल्ला केल्याचा आरोप होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा अशाच काही वादग्रस्त स्पर्धकांविषयी...