आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिशय सावळी होती 'बिदाई'ची ही अॅक्ट्रेस, 10 वर्षांत बदलला लूक, आता दिसते ग्लॅमरस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टार प्लस वाहिनीवरील गाजलेल्या 'सपना बाबुल का..बिदाई' (2007) या मालिकेत 'रागिनी'च्या भूमिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री पारुल चौहान तुम्हाला नक्कीच आठवत असेल ना... या मालिकेत पारुलने एका सावळ्या मुलीची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे खासगी आयुष्यातसुद्धा पारुल सावळीच होती. पण पारुलच्या तेव्हाच्या आणि आताच्या लूकमध्ये जमीनआसमानचा फरक आहे. पारुलचा आता लूक बराच बदलला असून ती आता ग्लॅमरस दिसते. 

मालिकेसाठी निवड झाली, यावर बसला नव्हता विश्वास...  
पारुलने सांगितले, की जेव्हा 'बिदाई'साठी तिने ऑडिशन दिली, तेव्हा प्रोड्यूसर राजन शाही आणि कास्टिंग डायरेक्टर विवेक जैन यांनी रागिनीच्या भूमिकेसाठी लगेचच तिची निवड केली होती. स्टोरीच्या डिमांडनुसार, त्यांना सावळी मुलगी या भूमिकेसाठी हवी होती. या मालिकेसाठी निवड झाली, यावर क्षणभर पारुलचा विश्वासच बसला नव्हता.
 
पालकांनी कधीही सावळी असल्याचे भासू दिले नाही...  
पारुल लखीमपुर खेरी जिल्ह्यातील (उत्तर प्रदेश) रहिवाशी आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले होते, "मी बालपणापासूनच खूप सावळी होते. मात्र माझ्या आईवडिलांनी कधीही मला तसे भासू दिले नाही. मी जगाच्या स्पर्धेत मागे पडावे, असे त्यांना वाटत नव्हते. एका छोट्या गावातून आलेल्या माझ्यासारख्या डक्सी लूक असलेल्या  मुलीने टीव्ही इंडस्ट्रीत स्वतःचे स्थान निर्माण केले, याचा मला अभिमान आहे." 
 
या मालिकांमध्ये झळकली आहे पारुल
पारुल चौहानने आतापर्यंत अनेक टीव्ही शोज केले आहेत. 2007 मध्ये आलेली 'बिदाई' ही तिची पहिला मालिका होती. त्यानंतर ती 'झलक दिखला जा-3' (2009), 'रिश्तों से बडी प्रथा' (2011), 'अमृत मंथन' (2012), 'पुनर्विवाह' (2013) 'मेरी आशिकी तुमसे ही' (2016) या शोजमध्ये झळकली. सध्या ती स्टार प्लस वाहिनीवरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' (2017) या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.

पुढील स्लाईड्सवर बघा,  'बिदाई'च्या 'रागिनी'चे 5 फोटोज...
बातम्या आणखी आहेत...