'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री दिशा वाकाणी लवकरच आई होणार आहे. मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट मयूर पांड्यांसोबत दिशाचे लग्न झाले असून हे या दाम्पत्याचे पहिले अपत्य असणार आहे. अलीकडेच मुंबईत दिशाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. मुंबईतील पवई येथील दिशाच्या राहत्या घरी हा कार्यक्रम झाला.
कुटुंब आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थित झालेल्या दिशाच्या डोहाळे जेवणाचा थाट बघण्यासारखा होता. गुजराती पद्धतीने हा कार्यक्रम झाला. यावेळी ट्रेडिशनल आउटफिटमध्ये दिशा अतिशय सुंदर दिसली. शिवाय तिच्या चेह-यावर यावेळी वेगळेच तेज दिसले.
दिशाच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशाच्या बेबी शॉवरचा हा कार्यक्रम दोन दिवस साजरा केला गेला. पहिल्या दिवशी सांजी सेरेमनी झाली तर दुस-या दिवशी श्रीमंत पूजन झाले. या कार्यक्रमाला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती. यावेळी मालिकेत टप्पूची अर्थातच दयाबेनच्या मुलाची भूमिका साकारणारा अभिनेता भव्य गांधी आपल्या ऑनस्क्रिन आईला शुभेच्छा द्यायला आवर्जुन हजर होता. भव्यने याचवर्षी ही मालिका सोडली होती.
दिशा वयाच्या चाळिशीत आई होणार आहे. 2016 मध्ये दिशा आणि मयूर यांचे लग्न झाले होते.
पाहुयात, दिशाच्या डोहाळे जेवणाची एक्सक्लूझिव्ह छायाचित्रे...