आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Photos: गुगलमध्ये काम करते ही मॉडेल, आता \'Bigg Boss 10\' मध्ये घेणार एन्ट्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉसचे दहावे पर्व येत्या 16 ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. या सीझनमध्ये सेलिब्रिटींसोबत सामान्य लोकसुद्धा सहभागी होणार आहेत. नेहमीप्रमाणे सलमान खान याही पर्वाचे सूत्रसंचालन करणार आहे. या शोच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी त्यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. यंदा ‘बिग बॉस’चे दहावे पर्व एका वेगळ्याच ढंगात सादर होणार आहे.
यंदा सेलिब्रिटींसोबतच काही सर्वसामान्य चेहऱ्यांचेसुद्धा आगमन होणार आहे. त्यापैकीच एक स्पर्धक सध्या चर्चेत आहे. ‘बिग बॉस’च्या प्रोमोमध्येही तिची झलक अनेकांनी पाहिलीच असेल. काश्मिरी सुंदरी म्हणून जिची ओळख करुन दिली जात आहे, ती स्पर्धक म्हणजे नितिभा कौल.
मॉडेल आहे नितिभा...
23 वर्षीय नितिभा स्वत:साठी उत्तुंग स्वप्न पाहणारी मुलगी. स्वत:वर विश्वास ठेवत पुढे जाण्याचा नितिभाचा स्वभाव आहे. मिस इंडिया या सौंदर्यवती स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या नितिभाने ‘बिग बॉस’मध्ये दिलेल्या स्वत:च्या माहितीनुसार ‘सध्या ती दिल्लीमध्ये राहात असून ‘गुगल मार्केटिंग सोल्युशन’मध्ये असोशिएट म्हणून कार्यरत आहे. तिला नृत्याची, गाणी ऐकण्याची आणि पोहण्याची आवड आहे. ‘मी माझ्या जीवनातील एका नव्या प्रवासाची सुरुवात करत आहे. येथे (बिग बॉसच्या घरात) मी जास्त काळ राहू शकेन किंवा नाही. असे असले तरीही मला तुम्हा सर्वांचे प्रेम आणि पाठिंब्याची गरज आहे’, असे नितिभा म्हणाली.
सोशल मीडियावरही निभिता सक्रिय आहे. पाहुयात, नितिभा कौलचे Instagram Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...