आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वेता तिवारीच्या डोहाळे जेवणात पोहोचली 'अनिता भाभी', बघा बेबी शॉवरचे Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौम्या टंडन, रती पांडे आणि आणखी काही मित्रांसोबत श्वेता तिवारी - Divya Marathi
सौम्या टंडन, रती पांडे आणि आणखी काही मित्रांसोबत श्वेता तिवारी

मुंबईः अभिनेत्री श्वेता तिवारी दुस-यांदा आई होणारेय. येत्या डिसेंबर महिन्यात ती आपल्या दुस-या बाळाला जन्म देणारेय. सोमवारी तिच्या कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांनी तिच्यासाठी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी श्वेता व्हाइट रंगाचा नी लेंथ ड्रेसमध्ये दिसली. 'भाभीजी घर पर है' या मालिकेत अनीता भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोम्या टंडन श्वेताच्या बेबी शॉवरमध्ये सहभागी झाली होती. सोम्यासोबतच रती पांडे, रतन राजपूत, विभा आनंद, सृष्टी रोडे, मनीष नागदेव हे सेलिब्रिटीसुद्धा या कार्यक्रमात पोहोचले होते.

15 वर्षाच्या मुलीची आई आहे श्वेता...
श्वेताला 15 वर्षांची मुलगी असून पलक तिचे नाव आहे. पलक श्वेता आणि तिचा पहिला नवरा राजा चौधरीची मुलगी आहे. 2007 मध्ये श्वेताने राजा चौधरीसोबत घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या सहा वर्षांनंतर 2013 मध्ये तिने अभिनेता अभिनव कोहलीसोबत दुसरे लग्न केले. लग्नापूर्वी तीन वर्षे दोघे एकमेकांना डेट करत होते. पलकनेच तिच्या आईला दुस-या लग्नसाठी तयार केल्याचे म्हटले जाते. जेव्हा श्वेता आणि अभिनवचे लग्न झाले, तेव्हा पलकने डान्स करुन तिचा आनंद व्यक्त केला होता.

'बेगुसराय'मध्ये दिसली होती श्वेता...
श्वेताला 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतील प्रेरणा या भूमिकेसाठी ओळखले जाते. 'नागिन', 'सजन रे झूठ मत बोलो', 'परवरिश आणि 'बालवीर' या मालिकांमध्ये ती झळकली आहे. 'बेगुसराय' ही तिची शेवटची मालिका आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, श्वेता तिवारीचे Baby Showerचे Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...