आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TVच्या 'इशिता'ने एन्जॉय केले प्री-वेडिंग बॅश, समोर आले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भावी नवरा विवेक दाहियासोबत दिव्यांका त्रिपाठी - Divya Marathi
भावी नवरा विवेक दाहियासोबत दिव्यांका त्रिपाठी
मुंबई: येत्या 8 जुलैला 'ये है मोहब्बते'ची इशिता अर्थातच अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी भावी पती विवेक दाहियासोबत लग्न करणार आहे. लग्नापूर्वी या कपलने फ्रेंड्ससोबत प्री-वेडिंग बॅश एन्जॉय केले. वेडिंग बॅशसोबत दिव्यांकाने विवेकच्या 'कवच' या शोच्या सक्सेसचा केकसुध्दा कापला.
जेव्हा विवेकसाठी शायर बनली दिव्यांका...
या सेलिब्रेशनला शायराना अंदाजात सांगताना दिव्यांकाने इंस्टाग्रामवर लिहिले, 'शूटिंग रात्री व्हावे...केअरिंग फ्रेंड्ससोबत व्हावे...यम्मी केक हातात असावे...होणारा नवरा क्रेझी असावा...तर क्या बात हो क्या बात हो...' इतकेच नव्हे तर तिने फ्रेंड्ससाठी शॉट्स लावले. दिव्यांका नो-अल्कोहॉलिक आहे. दिव्यांका हा फोटो शेअर करून लिहिले, '#NonAlcoholic #UnderEighteen #PaanShots! Well, that's what you get when the #BrideToBe is @divyankatripathi!'
असे आहे दिव्यांकाच्या लग्नाचे शेड्यूल...
- दिव्यांका आणि विवेक दोघे पारंपरिक पध्दतीने लग्न करणार आहेत. त्यात संगीत, मेंदी आणि रिसेप्शन असे तिन्ही फंक्शन होणार आहेत.
- लग्न दिव्यांकाचे मूळ गाव भोपाळमध्ये होणार असून रिसेप्शन चंदीगढमध्ये दिले जाईल.
- वरात 7 जुलैला भोपाळला पोहोणार आहे आणि त्याच दिवशी संगीत सेरेमनी होईल.
- लग्नाच्या विधी 8 जुलैला पूर्ण होतील.
- रिसेप्शन 10 जुलैला विवेकच्या मूळ गावी चंदीगढमध्ये ठेवण्यात येणार आहे.
- या सर्व फंक्शनमध्ये दोघांचे फॅमिली मेंबर्स आणि फ्रेंड्स उपस्थित राहतील.
- त्यानंतर मुंबईमध्ये दिव्यांका आणि विवकच्या फ्रेंड्ससाठी एक छोटीशी गेट टू गेदर पार्टी आयोजित केली जाईल.
'ये है मोहब्बते'च्या सेटवर झाली भेट...
- दिव्यांका आणि विवेक यांची भेट टीव्ही शो 'ये है मोहब्बते' मालिकेच्या सेटवर झाली.
- 6 महिने डेट केल्यानंतर दोघांनी 17 जानेवारीला साखरपुडा केला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दिव्यांका-विवेकच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...