आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी अशी दिसायची डॉली बिंद्रा, शिवीगाळ करण्यात आहे पटाईत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'बिग बॉस 10' या रिअॅलिटी शोच्या यंदाच्या पर्वात इंडियावाले टीममधील प्रियांका जग्गा ड्रामा क्वीन म्हणून चर्चेत आली आहे. बिग बॉसच्या घरात दाखल झाल्यापासून प्रियांका इतर सदस्यांसोबत सतत भांडण करताना आढळतेय. त्यामुळे प्रियांका जग्गाची भांडणं, कुठेतरी डॉली बिंद्राची आठवण करुन देत आहेत. बिग बॉसच्या चौथ्या पर्वात अभिनेत्री डॉली बिंद्राचे श्वेता तिवारीसोबत कडाक्याचे भांडण झाले होते. इतकेच नाही तर बिग बॉसच्या घराबाहेरील तिची भांडणं चांगलीच गाजली आहेत. काही वर्षांपूर्वी तिच्या शेजा-यांनी तिच्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती . या सिनेमांमध्ये झळकली आहे डॉली बिंद्रा...

20 जानेवारी 1970 रोजी मुंबईत जन्मलेल्या डॉली बिंद्राने वयाच्या 18 व्या वर्षी इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. खिलाडियों का खिलाडी (1996), गदर: एक प्रेम कथा (2001), यादें (2001), जो बोले सो निहाल (2005), डॉली की डोली (2015) या सिनेमांमध्ये डॉली झळकली आहे.

बिग बॉसच्या घरात होता डॉलीचा दबदबा...
डॉली बिग बॉसच्या चौथ्या पर्वात सहभागीझाली होती. भांडणं, वादविवाद करण्यात पटाईत असलेली डॉली बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांसाठी डोक्याला ताप ठरली होती. बाप पर मता जाना हे तिचे आवडते वाक्य होते. नेमक्या कुठल्या गोष्टीवरुन तिचा पारा चढेल, ही गोष्ट घरातील सदस्यांच्या समजण्यापलीकडे होती. श्वेता तिवारीसोबतचे तिचे भांडण चांगलेच गाजले होते.

डॉलीला त्रासले होते शेजारी...
2014 मध्या मालाड स्थित भूमी हाउसिंग सोसायटीने डॉली बिंद्राविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तिच्यावर शेजा-यांना शिवीगाळ केल्याचा आरोप होता. एका रिपोर्टनुसार, डॉलीच्या गैरवर्तणुकीमुळे सोसायटीतील लोक त्यांच्या मुलांना गार्डनमध्ये खेळायला सुद्धा पाठवत नव्हते.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, डॉली बिंद्राचे Unseen Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...