आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोमातून बाहेर आला 'चिडियाघर'चा मेंढक प्रसाद, हॉस्पिटलमध्ये साजरा केला 20 वा वाढदिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनीष आई आणि भावासोबत वाढदिवस साजरा करताना... - Divya Marathi
मनीष आई आणि भावासोबत वाढदिवस साजरा करताना...
मुंबईः 'चिडियाघर' या विनोदी मालिकेत मेंढक प्रसाद या भूमिकेतून प्रसिद्धीझोतात आलेल्या मनीष विश्वकर्मा या कलाकाराने divyamarathi.com सोबत आपला वाढदिवस साजरा केला. मुंबईतील कृती केअर हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या मनीषने केक कापून आपला 20 वा वाढदिवस साजरा केला.
यावेळी मनीषचा थोरला भाऊ आशिष विश्वकर्मासोबत आम्ही बातचित केली. त्याने सांगितेल, ''मनीष नेहमीच आपल्या बर्थडे ला लकी डे समजतो. त्याच्या आयुष्यात आलेल्या चांगल्या संधी या त्याला वाढदिवशीच मिळाल्या आहेत. आपल्या वाढदिवशी तो मित्रांना पार्टी द्यायचा. आज मात्र तो पार्टी करण्याच्या अवस्थेत नाही. मात्र आमचे संपूर्ण कुटुंब त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. लवकरच तो बरा होईल अशी देवाकडे आम्ही प्रार्थना करतोय.''
जून महिन्यात शूटिंगला जात असताना गोरेगाव येथील आरे. कॉलनीत मनीषचा बाइकने अपघात झाला. गंभीर घायाळ झालेल्या मनीषला उपचारांसाठी कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ब्रेन हॅमरेज झाल्याने त्याच्या मेंदूत रक्त गोठले होते आणि तो कोमात गेला होता. मात्र आता तो कोमातून बाहेर आला असून उपचारांना साथ देत आहे. धोक्याबाहेर आल्यानंतर त्याला कोकिलाबेन हॉस्पिटलमधून कृती केअरमध्ये शिफ्ट करण्यात आले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, Divyamarathi.com सोबतची मनीषच्या बर्थडे सेलिब्रेशनची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...