मुंबईः 'चिडियाघर' या छोट्या पडद्यावरील मालिकेत मेंढकप्रसादच्या भूमिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला बालकलाकार मनीष विश्वकर्माला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आता तो आपल्या घरी असून कुटुंबीय त्याची काळजी घेत आहेत.
दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच जून महिन्यात शूटिंगला जात असताना आरे कॉलनी, गोरेगांव (मुंबई) मध्ये मनीषचा बाइक अपघात झाला होता. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी कोकिलाबेन हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले होते. ब्रेन हॅमरेजमुळे तो कोमात गेला होता. मात्र आता तो धोक्याबाहेर असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मनीषची बहीण अर्शदीपने divyamarathi.com सोबत बोलताना सांगितले, ''आम्ही मनीषला आता घरी आणले आहे. डॉक्टरांच्या मदतीने तो आम्ही त्याला नार्मल आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करतोय. त्याला गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यामुळे पूर्णपणे बरे व्हायला आणखी थोडा वेळ लागणार आहे. त्याला आता तुमच्या सर्वांच्या प्रेमाची आणि प्रार्थनेची गरज आहे.''
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मनीष विश्वर्माची फॅमिली मेंबर्ससोबतची छायाचित्रे...