आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO: ही आहे प्रेक्षकांची लाडकी \'चकोर\', रिअल लाईफमध्ये आहे कुकिंगची आवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(चकोर उर्फ स्पंदन चतुर्वेदी)
मुंबईः छोट्या पडद्यावरील 'उडान' या लोकप्रिय मालिकेत चकोर हे पात्र साकारणारी बालकलाकार स्पंदन चतुर्वेदी हिला ख-या आयुष्यात कुकिंगची विशेष आवड आहे. अलीकडेच या सात वर्षीय चिमुकलीने शोच्या सेटवर लाइट हेल्दी नाश्ता तयार केला. ही रेसिपी तिने वाचकांसोबत शेअर केली आहे.
dainikbhaskar.comच्या स्पेशल कव्हरेजअंतर्गत स्पंदनने चटकदार भेळ बनवली. यावेळी तिने सांगितले, "मी रिअल लाइफमध्ये खूप फुडी आहे. घरी बनवलेले जेवण मला पसंत आहे. मात्र कधी संधी मिळाल्यास तिखट मसालेदार फूडसुद्धा मी खाते. पास्ता, पिज्जा आणि चटकदार भेळ मला पसंत आहे. माझी आई खूप चविष्ट जेवण बनवले. मला वरणभात खूप आवडतो."
स्पंदनने वाचकांसाठी चटकदार भेळची रेसिपी शेअर केली आहे.
साहित्य - मुरमुरे, कांदा, टमाटर, उकळलेले आलू, गोड चटणी, मसाला, शेव, चने, पूरी आणि कोथिंबिर
भेळ बनवण्याची कृती - सर्वप्रथम कांदा, टमाटर, कोथिंबिर आणि उकळलेल्या आलूचे छोटेछोटे काप करुन घ्या. नंतर एका भांड्यात मुरमुरे, टमाटर आणि कांदा मिक्स करुन घ्या. त्यामुळे आलूचे छोटेछोटे केलेले तुकडे टाका. वर सांगितलेली चटणी त्यात मिसळून घ्या. त्यानंतर शेव आणि चने टाकून व्यवस्थित एकजीव करुन घ्या. शेवटी कोथिंबिर टाका.
स्पंदनने आपल्या आईवडिलांसोबत चटकदार भेळचा आस्वाद घेतला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा स्पंदनची भेळ तयार करतानाची खास छायाचित्रे...
सर्व फोटोः अजीत रेडेकर