आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'CID'च्या दयाला मिळाली 'सिंघम-2'मध्ये भूमिका, सुरु झाले सिनेमाचे शुटिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सोनी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'CID'मधील सीनिअर इन्स्पेक्टर दयाला एक मोठे यश मिळाले आहे. अनेक अॅक्शन आणि कॉमेडी सिनेमांचे दिग्दर्शन करणा-या दिग्दर्शक रोहित शेट्टीने त्याच्या आगामी 'सिंघम 2' या सिनेमातटीव्ही अभिनेता दयानंद शेट्टीला एक महत्त्वपूर्ण भूमिका दिली आहे. यापूर्वी जॉनी गद्दार (2007) आणि रनवे (2009)या सिनेमात दयानंद शेट्टी झळकले आहेत.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दयानंद शेट्टी यांना ही भूमिका मिळण्यात 'खतरों के खिलाडी 5' या शोचा मोलाचा वाटा आहे. या शोचा होस्ट रोहित दयाच्या अभिनयाने इम्प्रेस आहे.
'सिंघम 2'मध्ये अजय देवगणसह पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दया झळकणार आहेत. या सिनेमाचे शुटिंग सुरु झाले आहे. यावर्षी 15 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा दयानंद शेट्टीचा खास अंदाज...