'बिग बॉस 7' हे पर्व संपून जवळपास दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. या शोचे ग्रँड फिनाले 28 डिसेंबर 2013रोजी झाले होते. 'बिग बॉस 7'ची विजेती गौहर खान ठरली होती. तिला शोची ट्रॉफीसोबत 50 लाखांचे बक्षिस देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु कलर्स चॅनलने तिला अजूनही बक्षिसाचे पैसे दिलेले नाहीये. गौहरने एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला आहे, की तिला अद्याप 'बिग बॉस 7'कडून बक्षिसाचे पैसे मिळालेले नाहीत.
'बिग बॉस 7' शो होस्ट करणा-या
सलमान खानेन तिला शोच्या ग्रँड फिनालेच्या दिवशी ट्रॉफी दिली होती. परंतु बक्षिस स्वरुप पैसे देण्यात आले नव्हते. शोदरम्यान गौहर 3 महिने बिग बॉस घराच्या बाहेरही होती. याच पर्वाचे उपविजेते तनिषा मुखर्जी दुस-या तर अयाज खान तिस-या स्थानावर होता. तसेच, चौथ्या स्थानावर संग्राम सिंह होता.
एका प्रसिध्द वर्तमानपत्रासोबत बातचीत करताना गौहरने सांगितले, 'मला बिग बॉसकडून फक्त ट्रॉफी मिळाली आहे. मी माझ्या बक्षिसाची म्हणजेच मला मिळणा- या पैशांची वाट पाहत आहे. मी सध्या चॅनलसाठी 'खतरो के खिलाडी'मध्ये काम करत आहे. परंतु आता चॅनलसोबत काम करताना पैशांविषयीच्या गोष्टी मला खोट्या वाटायला लागल्या आहेत. 'बिग बॉस 7'मध्ये काम केल्याने माझ्या स्वभावात परिवर्तन झाले आहे. मला प्रेक्षकांकडून फक्त प्रेम आणि आदर हवा आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा बक्षिसाचे पैसे मिळाले नाही तरीही आनंदी आहे गौहर खान...