आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हळदीच्या कार्यक्रमादरम्यान भारतीला सर्वांदेखत कोसळले रडू, हर्षने असे घेतले तिला प्रेमाने जवळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 2 डिसेंबर रोजी सकाळी भारतीच्या हळदीचा कार्यक्रम पार पडला. हर्ष आणि भारतीच्या लग्नाचे सर्व विधी गोवामध्ये पार पडत आहेत. हर्ष आणि भारतीचे नुकतेच समोर आलेल्या फोटोंमध्ये ही दोघे पिवळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये बसलेले दिसत आहेत. भारतीने पिवळा गाऊन घातला होता.. हळद लावताना भारती भावनिक झाली आणि रडू लागली यावेळी हर्षने तिची काळजी घेत तिला सावरले. भारतीसोबत रडू लागले तिचे फ्रेंड्सही...

 

- हळदीदरम्यान डिझायनर रोहित वर्मा आणि अदा खानही दिसले. 
- रोहितने सांगितले की, "भारतीला रडण्यावर नियंत्रण ठेवता येत नव्हते. तिला विश्वासच बसत नव्हता की तिचे लग्न होत आहे."  
- अदाने सांगितले, "आजपर्यंत भारतीने सर्वानाच हसवले आहे आणि आज तिला असे रडताना पाहून आम्हालाही रडू कोसळले." 

 

शनिवारी रात्री झाली कॉकटेल पार्टी..
- शनिवारी रात्री एका कॉकटेल पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
- पार्टीत भारतीने लाल रंगाचा गाऊन घातला होता तर हर्ष ब्लॅक-व्हाइट टक्सीडो सूटमध्ये दिसला. फोटोमध्ये भारती-हर्षशिवाय नेहा कक्कड, मनीष पॉलस सुनील ग्रोवरसुद्धा होता. पार्टीची सुरुवात टीव्ही कपल पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा यांच्या डान्सने झाली. त्यानंतर कृष्णा, अभिषेक आणि सिद्धार्थ जाधव यांनी कॉमेडीचा तडका लावला.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, भारतीच्या हळदीच्या समारंभाचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...