आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FIX झाली भारती-हर्षच्या लग्नाची तारीख, असा आहे Wedding Plan

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कॉमेडीयन भारती सिंह सध्या कपिल शर्माच्या शोमध्ये कॉमेडी शोमध्ये काम करत आहे. सध्या भारती तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत आहे. अशी बातमी आहे की, बॉयफ्रेंड बर्ष लिंबाचियासोबत भारतीच्या लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भारतीने सांगितले की, लग्नासाठी 30 नोव्हेंबर आणि 3-6 डिसेंबरचा मुहुर्त ठेवण्यात आलेला आहे. भारतीने सुरु केली लग्नाची तयारी...
 
- भारतीने एका मुलाखतीत सांगितले की, सध्या ती लग्नाच्या तारखेवर विचार करत आहे कारण तिची इच्छा आहे ती तिचे सर्व नातेवाईक आणि मित्रमैत्रीणींना डेट अॅडजस्ट करणे सोपे व्हावे अशीच तारीख तिला ठरवायची आहे. 
- भारतीच्या लग्नात हळद, मेहंदी, संगीत यांसारखे समारोह होणार आहेत ज्याची तयारी आताच सुरु झाली आहे. 
- भारतीने सांगितले की, ती लग्नासाठी लाल अथवा पिंक रंगाचा लेहंगा घालणार आहे. हा डिझायनर लेहंगा ती स्वतःसाठी खरेदी करणार आहे. 
- लहंग्यासोबत गोल्डन झुमके घालणार आहे जो हर्ष घेऊन येईल. लग्न करतोय तर थोडाफार खर्चही करेल असे हसत भारती म्हणाली.
- लग्नाचे ठिकाण ठरविण्यासाठी तीन जागांचा विचार केला जाणार आहे. भारतीने मुंबई, पंजाब किंवा गोवा या तीन जागांपैकी एका जागेची निवड करणार असल्याचे सांगितले. 
जूनमध्ये झाला हर्ष-भारतीचा साखरपुडा 
- भारतीने बॉयफ्रेंड हर्षसोबत जून 2017 साली साखरपुडा केला. 
- घरच्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. भारतीने इन्सटाग्रामवर याची माहिती पोस्ट केली. 
- साखरपुड्यावेळी भारतीने गोल्ड अॅण्ड रेड रंगाचा सुट घातला होता तर हर्ष फॉर्मलमध्ये होता. 
- हर्ष आणि भारती गेल्या 8 वर्षापासून रिलेशनशीपमध्ये आहेत. भारतीने एका इंटरव्युदरम्यान याची माहिती दिली होती. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, हर्ष आणि भारतीबद्दलच्या काही खास गोष्टी..
बातम्या आणखी आहेत...