Home »TV Guide» Comedian Bharti Singh Grah Pravesh In Her Sasural, Haarsh Limbachiyaa

सासरी असे झाले भारतीचे वेलकम, कलश ओलांडून केला गृहप्रवेश

दिव्य मराठी वेब टीम | Dec 07, 2017, 17:05 PM IST

मुंबई- कॉमेडियन भारती सिंह पती हर्ष लिम्बाचियासोबत गुरुवारी तिच्या सासरी पोहोचली. सासरी आलेल्या भारतीचे हर्षच्या फॅमिलीने स्वागत केले. घराच्या दारात भारती-हर्ष यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर भारतीने धान्याने भरलेला कलश ओलांडले आणि घरात प्रवेश केला. भारतीने गृहप्रवेशाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यासोबत तिने लिहिले आहे, 'Sasural ki Hawa mein jaadu hai.... Happiness is being welcomed by in laws in such a cute way... Love you guys! We're going to have lot of fun and awesome memories together ❤🤗'.

3 डिसेंबरला गोव्यात झाले लग्न
- कॉमेडियन भारती सिंह आणि क्रिएटीव्ह रायटर हर्ष लिम्बाचिया यांचे 3 डिसेंबर रोजी गोव्यात लग्न झाले होते. भारतीच्या लग्नाचे फंक्शन 6 दिवस चालले.
- मुंबईत भारतीच्या घरी बांगड्या भरणे, माता की चौकीचे आयोजन करण्यात आले होते. गोव्यात पूल पार्टी, कॉकेटल पार्टी, मेहंदी, हळदी आदी फंक्शन झाले. लग्न आणि रिसेप्शन गोवा येथे झाल्यानंतर नवविवाहित जोडपे गुरुवारी मुंबईत परतले.

Next Article

Recommended