आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारती लहान असतानाच झाला होता तिच्या वडिलांचा मृत्यू, भाऊ चालवायचा दुकान, अशी आहे फॅमिली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - स्टँडअप कॉमेडीयन भारती सिंह 3 डिसेंबर रोजी बॉयफ्रेंड हर्ष लिंबाचियासोबत लग्नगाठीत अडकणार आहे. सर्वांना पोट धरुन हसायला लावणारी भारतीच्या आयुष्यात असाही काळ होता जेव्हा तिच्या वाढलेल्या वजनामुळे ती रात्ररात्रभर रडायची. आजच्या या पॅकेजमध्ये भारतीने आमच्या प्रतिनीधीशी शेअर केलेल्या काही खास गोष्टींची माहिती खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 2 वर्षाची असताना वारले वडील...

- भारतीने सांगितले की, "मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे. आम्ही तीन भाऊ-बहीण आहोत. माझ्या आईने वयाच्या 17 व्या वर्षी लग्न केले होते आणि 23 वर्षाची होईपर्यंत ती तीन मुलांची आईही बनली होती. 
- मी केवळ 2 वर्षाची होती जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्याबद्दल काहीच आठवणी माझ्याकडे नाहीत. आईने दुसरे लग्न न करता स्ट्रगल करत आम्हाला मोठे केले. माझे लहानपणी बरेचसे गरीबीतच गेले. मोठे भाऊ-बहीण घरासाठी दोन वेळचे अन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे. बरेचदा आम्ही सर्व जण उपाशीही झोपलो आहोत." 

 

भावाचे आहे जनरल स्टोअर..

- भारतीच्या फॅमिलीचे पाहीले तर, तिचा भाऊ धीरज सिंहचे अमृतसरमध्ये जनरल स्टोअर्स आहे. तर मोठी बहीण पिंकी राजपुत अमृतसरमध्ये सेटल आहे. 
- भारती सिंह 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चैलेंज'ची सेकंड रनरअप होती. टीव्हीवर कृष्णा अभिषेकसोबत 'कॉमेडी नाइट्स बचाओ' आणि 
 'कॉमेडी नाइट्स लाइव' केल्यानंतर भारती सध्या कपिल शर्मा शोमध्ये दिसत आहे. 
 
 पुढच्या स्लाईडवर वाचा, भारतीच्या जीवनातील काही खास Facts...

बातम्या आणखी आहेत...