आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल करणार अभिनय, यशराजच्या सिनेमात मिळाला लीड रोल!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या टीव्ही शोमुळे प्रसिद्ध झालेला विनोदवीर कपिल शर्माचे करिअर सध्या यशोशिखरावर आहे. त्याची डिमांड बरीच वाढली आहे. आता बातमी आहे, की छोट्या पडद्यावर आपला जलवा दाखवल्यानंतर आता कॉमेडी किंग कपिल मोठ्या पडद्यावर आपला दम दाखवणार आहे.
होय, बॉलिवूडमधून बातमी आहे, की यशराज बॅनरने आपल्या आगामी सिनेमातील प्रमुख भूमिकेसाठी कपिलशी संपर्क साधला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यशराज फिल्म्सच्या काही लोकांनी अलीकडेच कपिलची भेट घेतली. आता या भेटीत काय घडले? कपिलने सिनेमासाठी आपला होकार दिला की नाही, याला अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाहीये.
यशराज बॅनरच्या 'वाई' या बॅनरमध्ये तयार होत असलेल्या सिनेमाची ऑफर कपिलला देण्यात आली आहे. वाई बॅनरमध्ये यापूर्वी मेरे डॅड की मारुती, लव का द एंड या सिनेमांची निर्मिती करण्यात आली आहे.
असो, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गुत्थी या पात्रामुळे प्रसिद्ध झालेला अभिनेता सुनील ग्रोवरसह कपिल आगामी एका सिनेमात झळकणार आहे.