आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Comedian Kapil Sharma Finally Speaks On His Controversy

अभिनेत्रींसोबत गैरवर्तन केल्याच्या बातम्यांवर बोलला कपिल, जाणून घ्या काय म्हणाला?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कपिल शर्मा
अलीकडेच एका मुलाखतीत कॉमेडी किंग कपिल शर्माने सांगितले, की लोक सत्य जाणून घेत नाहीत आणि केवळ सूत्रांकडून आलेल्या बातम्या देतात. असे करणे चुकीचे आहे. कपिलचे हे वक्तव्य त्या बातम्यांना खंडन करतात, ज्यामध्ये सांगण्यात आले होते, की एका अवॉर्ड शोमध्ये त्याने दारू पिऊन महिलांसोबत गैरवर्तन केले होते.
निरर्थक बातम्या आहेत- कपिल
कपिलने बातम्यांना चुकीचे सांगून या बातम्या निरर्थक आहेत, असे सांगितले. त्याने हे वक्तव्य पेटाच्या 'पर्सन ऑफ द इअर' अवॉर्ड सोहळ्यानंतर दिले.
पेटाचा अवॉर्ड मिळणे आनंदाची गोष्ट-
कपिलने जंजीर नावाचा श्वान दत्तक घेतला होता आणि त्याची देखरेख केली होती. त्यानंतर पेटाने त्याला हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. पुरस्काराविषयी कपिलने सांगितले, 'मी हा अवॉर्ड स्वाकारून आनंदी आहे. जंजीर आणि मी पेटा अवॉर्डला नेहमी स्मरणात ठेवेल.'
श्वान खरेदी करू नका, दत्तक घ्या-
यासोबतच कपिलने लोकांना अपील केले, की श्वान खरेदी करू नका, दत्तक घ्या. ज्या कुणाकडे संयम, साधन आणि वेळ आहे, त्यांना गरजू आणि भटक्या श्वानांना किंवा मांजरींना दत्त घेतले पाहिजे.
कपिल आणि त्याच्या शोचे इतर सदस्य जुलैमध्ये 'पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स'व्दारा आयोजित अभियानात सामील होऊन भटक्या पक्षांना, प्राण्यांना दत्तक घेण्यासाठी जनजागृती करताना दिसले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या इव्हेंटचे काही फोटो...