मुंबईः विनोदवीर कपिल शर्मा सध्या कॉमेडी नाइट्स विथ कपिल फेम दादी (अली असगर), बुआ (उपासना सिंह), पलक (किकू शारदा), गुत्थी (सुनील ग्रोवर) आणि
आपल्या टीमसोबत यूएस आणि कॅनडाच्या टूरवर आहे. तेथून परतल्यानंतर तो या शोच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. सध्या तो यूएस आणि कॅनडा येथे काही शोज करणार आहे. पहिला शो एटलांटिक सिटी, न्यू जर्सी (अमेरिका) येथे होणारेय.
कपिलला स्लिप डिस्कमुळे तीन आठवड्यांचा ब्रेक घ्यावा लागला. मात्र आता तो बरा आहे. त्यामुळे परदेशात शोजसाठी आपल्या टीमसोबत परदेशी रवाना झाला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, परदेशी रवाना होण्यापूर्वी आपल्या टीमसोबतची कपिलची छायाचित्रे...