आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Comedian Kapil Sharma Recieved A Summon From Court

अडचणीत सापडला कपिल, गर्भवती महिलेचा अवमान केल्याप्रकरणी कोर्टाने पाठवले समन्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलर्स वाहिनीवरील प्रसिद्ध शो कॉमेडी नाइट्स विथ कपिलचा होस्ट कपिल शर्माच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. अलीकडेच त्याने सलमान खानच्या CCLच्या चौथ्या पर्वाचे होस्टिंग करण्यास नकार दिला आणि आता महाराष्ट्र महिला आयोगाच्या तक्रारीवरुन कोर्टाने त्याला समन्स पाठवले आहे.
कपिल शर्माने त्याच्या शोच्या एका एपिसोडमध्ये खराब रस्त्यांची टर काढत गर्भवती महिलांविरोधात एक आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्याच्या या विनोदावर सेटवर उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवल्या होत्या. मात्र महिला आयोगाला त्याचा हा विनोद मुळीच पचनी पडला नाही.
महाराष्ट्र महिला आयोगाने कपिलच्या विनोदावर आक्षेप घेत त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केली होती. या आधारावर कोर्टाने कपिल शर्माला समन्स पाठवले आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या कपिलने असा कोणता विनोद केला, ज्यामुळे तो अडचणीत सापडला...