मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री आणि कॉन्ट्रोव्हर्शिअल क्वीन
राखी सावंत स्वयंवरानंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर नवरीच्या रुपात अवतरली आहे. तिच्या या रुपात कॉमेडी ट्विस्ट आहे. 'कॉमेडी क्लासेस' या लाफ्टर शोच्या आगामी एपिसोडमध्ये राखी सावंत आणि 'बिग बॉस' फेम एजाज खानचे ऑनस्क्रिन लग्न रंगणारेय.
या शोच्या ऑन लोकेशनची छायाचित्रे समोर आली असून यामध्ये राखी नववधूच्या रुपात नटलेली दिसत आहे. तर एजाजसुद्धा नवरदेवाच्या रुपात दिसतोय. फोटोजमध्ये राखी रेड साडी आणि हेवी ज्वेलरीमध्ये दिसतेय, तर एजाजने गोल्डन आणि ब्लॅक शेरवानी परिधान केलीये.
लाइफ ओकेवर प्रसारित होणा-या या एपिसोडमध्ये शोचे लीड स्टार्स अर्थातच कृष्णा अभिषेक, भारती सिंह, सिद्धार्थ सागर, मुबीन सौदागर आपल्या लाफ्टर डोजने प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतील.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'कॉमेडी क्लासेस'ची ऑन लोकेशन झलक...