आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कॉमेडी नाइट विथ कपिल\'च्या सेटला भीषण आग, कपिलचा फोन स्विच ऑफ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंककलर्स वाहिनीवर प्रसारित होणा-या 'कॉमेडी नाइट विथ कपिल' या लोकप्रिय मालिकेच्या सेटला आज (बुधवारी) भीषण आग लागली असून संपूर्ण सेट आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. गोरेगाव फिल्मसिटीत 'कॉमेडी नाइट विथ कपिल'चा सेट उभारण्यात आला होता.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (बुधवारी) सकाळी आठच्या सुमारास या सेटला आग लागली. संध्याकाळी या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार होती. त्यामुळे लाईटमन, स्पॉट बॉय सेटवर हजर होते. सेटवर काम सुरु असताना त्याच्या मागील बाजूस मोठा आवाज झाला आणि सेटला आग लागली. काही क्षणांतच संपूर्ण सेटवर आग पसरली. याबाबत माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाचे जवान दहा बंबांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फिल्मसिटीत फार आतमध्ये हा सेट उभारण्यात आला होता. काही अन्य मालिका आणि टीव्ही शोजचे सेटही त्याच्या बाजूलाच आहेत. हे सगळेच सेट लाकडाचा जास्तीत जास्त वापर करून बनवण्यात आले आहेत. त्यामुळेच आग आणखी पसरू नये म्हणून बाजूचे सर्व सेट खाली करण्यात आले.

कलर्सच्या प्रवक्त्यांनी म्हटले, की सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीत फार नुकसान झालेले नाही. फक्त एका रुमला आग लागली, जिथे कपडे आणि मेकअपचे सामान ठेवण्यात आले होते.

मात्र सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या आगीत खूप नुकसान झाले आहे. याविषयी कपिल शर्माशी बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्याचा फोन स्विच ऑफ येतोय.

पुढे बघा जळत्या सेटचे छायाचित्र...