आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Comedy Nights With Kapil Is Not Going Off Air”, Says Pinky Bua

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पिंकी बुआचे स्पष्टीकरण, 'डबाबंद होणार नाही 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'ची पिंकी बुआ अर्थातच उपासना सिंहने सांगितले, की शो बंद होणार नाहीये. 15 जून रोजी अशी बातमी आली होती, की 'कॉमेडी नाइट्स...' सप्टेंबरमध्ये डबाबंद होणार आहे. divyamarathi.comने उपासना सिंहसोबत याविषयी बातचीत केली तेव्हा ती स्वत: ही बातमी ऐकून स्तब्ध झाली.
ती म्हणते, 'आम्हाला याविषयी काहीच माहिती देण्यात आलेली नाहीये. मात्र या शोच्या दुस-या सीजनची तयारी केली जात आहे. जेव्हा मी ही बातमी ऐकली तेव्हा मी निर्मात्यांशी बोलले त्यांनी
सांगितले, की शो बंद होणार नाहीये. कपिलचेसुध्दा असेच म्हणणे आहे.'
जेव्हा आम्ही उपासनाला शोच्या व्यस्त वेळापत्रकाविषयी विचारले, 'शोचे वेळापत्रक खूप व्यस्त आहे. त्यासाठी आम्हाला रात्रं-दिवस शुट करावे लागते. हे सर्व वेळेपत्रक आमच्यासाठी खूप महत्वाचे असते तसेच आम्हाला खूप थकवा येतो. कदाचित कपिलला ब्रेकची गरज असावी. जर असे असेल तर आमच्यासाठीसुध्दा चांगला निर्णय आहे. मात्र सध्या शो बंद होणार नाहीये.'
शोच्या निर्मात्यांनीसुध्दा सांगितले, 'शो बंद होणार नाहीये'...वाचा पुढील स्लाइड्सवर...