आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Comedy Nights With Kapil Last Episode To Air On 24 January

कपिल-चॅनलमध्ये वाद? टेलिकास्ट झाला नाही \'कॉमेडी नाइट्स...\'चा शेवटचा एपिसोड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : कपिल शर्मा - Divya Marathi
फाइल फोटो : कपिल शर्मा
मुंबई- मागील एपिसोडमध्ये कपिल शर्माने घोषित केले होते, की 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' शोचा शेवटचा एपिसोड 17 जानेवारीला प्रसारित होणार आहे. परंतु असे झाले नाही. सूत्रांच्या सांगण्यानुसार, कपिलसोबत झालेल्या मतभेदामुळे चॅनलने या शोचा शेवटचा एपिसोड प्रसारित होऊ दिला नाही. रविवारी (17 जानेवारी) कपिलच्या टि्वटने संकेत मिळाले होते, की चॅनलमुळे शेवटचा एपिसोड डिले होऊ शकतो.
कपिलने काय टि्वट केले...
कपिलने टि्वट करून लिहिले, 'अपेक्षा आहे, की कलर्स आज रात्री अक्षय कुमारसोबत 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' शोचा शेवटचा एपिसोड टेलिकास्ट करेल. ही आमची प्रेक्षकांचे आभार मानण्याची स्टाइल आहे.'
आता 24 जानेवारीला होईल प्रसारण...
'कॉमेडी नाइट्स...'चा शेवटचा एपिसोड 24 जानेवारीला टेलिकास्ट केला जाणार आहे. रविवारी (17 जानेवारी) रात्री चॅनलने याचा प्रोमोसुध्दा 'कॉमेडी नाइट्स बचाओ'दरम्यान दाखवला. शेवटच्या एपिसोडमध्ये अक्षय कुमार आणि निमृत कौर 'एअरलिफ्ट' या आगामी सिनेमाचे प्रमोशन करताना दिसणार आहेत. हा सिनेमा 22 जानेवारीला रिलीज होत आहे.
सुनील ग्रोवरने केली चॅनल आणि कपिल यांच्यातील मतभेदाविषयी पुष्टी...
एका प्रतिष्ठीत वेबसाइटनुसार, सुनील ग्रोवरने चॅनल आणि कपिल यांच्यातील मतभेदाविषयी पुष्टी केली आहे. सुनीलने सांगितले, 'हो, हे सत्य आहे. कपिल आणि चॅनल यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे चॅनल हा एपिसोड टेलिकास्ट होऊ देत नाहीये. मला अतिशय दु:ख वाटते आणि चिंतासुध्दा आहे, की आता हा एपिसोड कधी प्रसारित होईल.'
सुमोना म्हणाली, संध्याकाळी माहित झाले एपिसोड टेलिकास्ट होणार नाही...
सुमोना चक्रवर्ती म्हणाली, की शेवटचा एपिसोड टेलिकास्ट होणार नाही याची माहिती रविवारी (17 जानेवारी) संध्याकाळी देण्यात आली होती. तिलादेखील हे संध्याकाळीच माहिती झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, कपिलच्या शेवटच्या एपिसोडचे काही फोटो...