आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'कॉमेडी नाइट्स...'च्या चाहत्यांसाठी खुश खबर, डबाबंद होणार नाही शो!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: लोकप्रिय टीव्ही शो 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. निर्माती प्रिती सिमोएनुसार, हा शो बंद होणार नाहीये. नुकतीच एक बातमी आली होती, की 'कॉमेडी नाइट्स...' सप्टेंबरमध्ये डबाबंद होणार आहे. होस्ट कपिल शर्माने टि्वट केले होते, त्यामध्ये शो बंद होण्याचे संकेत दिले होते.
निर्मात्यानुसार, या टि्वटचा चुकिचा अर्थ काढल्याने अशा अफवा सर्वत्र पसरल्या आहेत. एका प्रसिध्द वर्तमानपात्रासोबत बातचीत करताना प्रितीने सांगितले, कपिलने शो बंद होण्याविषयी नव्हे तर शुटमधून ब्रेक घेण्याविषयी टि्वट केले होते. कपिलच्या या टि्वटने चॅनललासुध्दा त्रास सहन करावा लागला आहे.
या बातचीतदरम्यान प्रितीने असेही सांगितले, की 'आम्हाला शोच्या सेट आणि कलाकारांमध्ये परिवर्तन करायचे आहे. मात्र एका आठवड्यात दोन एपिसोडच्या शुटिंगमुळे आम्हाला वेळ मिळत नाहीये. म्हणून आम्ही काही नवीन एपिसोड एकत्र शुट करणार आहोत आणि 15-20 दिवसांचा ब्रेक घेऊन एका नवीन स्वरुपात प्रेक्षकांच्या भेटीस येऊ. जेणेकरूनप प्रेक्षकांनाही शोमध्ये नवीन काहीतरी बघण्यास मिळेल.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा काय होते कपिलचे टि्वट आणि शो बंद होण्याचे कोणते कारण सांगितले जात होते. सोबतच कधी-कधी चर्चेत आला शो...